रोहयोच्या कामावर शेतकर्‍यांनाही दाखवले मजूर

 

ग्रामरोजगार सेवकासह संगणक परिचालकावर गुन्हा

 

बीड | वार्ताहर

 

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचा कसा गैरफायदा घेतला जातो हे अनेकदा स्पष्ट झालेेले आहे. आता तर ग्रामरोजगार सेवक आणि संगणक परिचालकाने थेट शेतकर्‍यांना रोहयोच्या विहीरीचे आमिष दाखवत त्यांची महत्वाची कागदपत्रे व फोटो हस्तगत केले. त्याच आधारे नंतर विहीरीच्या कामकाजासाठीच्या हजेरी मस्टरची बनावट प्रति व कागदपत्रे तयार करुन विहीरीचे अनुदान व शेतकर्‍यांचे बनावट बँक खाते उघडून त्यांना रोहयोचे मजुर दाखवून तब्बल 3 लाख 33 हजार 754 रुपये परस्पर हडप केले. या प्रकरणात दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.

 

 भास्कर ज्ञानोबा फुंदे (ग्रामरोजगार सेवक, उमराई, ता.अंबाजोगाई) व नितीन जनार्धन केंद्रे (संगणक परिचालक, ग्रामपंचायत कार्यालय,उमराई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत उमराई येथील शेतकरी शिवाजी दगडू केंद्रे यांनी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. सन 2017 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत उमराई येथे हा सारा प्रकार घडला. शिवाजी केंद्रे यांना नितीन व भास्कर या दोघांनी विश्वासात घेतले. आम्ही तुमच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मिळवून देतो असे सांगत शिवाजी केंद्रे यांच्याकडून सात बारा, आधार कार्ड, नमुना 8-अ व फोटो घेतले.  याच कागदपत्राच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर विहीर कामकाजाच्या हजेरी मस्टरची बनावट प्रत काढून बील उचलले. तसेच शिवाजी केंद्रे व इतर शेतकर्‍यांचे बनावट खाते उघडून  त्यांना रोहयोचे मजुर दाखवून 3 लाख 33 हजार 754 रुपयांची रक्कम हडप करुन शेतकर्‍यांसह शासनाची फसवणूक केली. त्यावरुन दोघांवर गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक भालेराव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.