परळी | वार्ताहर
तालुक्यातील नागापुर येथील एका पेट्रोल पंपाचे झाकण उघडून चोरट्यांनी तब्बल 2 हजार 2 लिटर डिझेलची चोरी केली. 10 ते 11 सप्टेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. चोरीला गेलेल्या डिझेलची किंमत तब्बल 1 लाख 93 हजार रु. इतकी आहे.
नागापूर येथे तिरुपती पेट्रोलियम पंप आहे. या पंपातील हौदात डिझेल व पेट्रोल ठेवलेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान 2 हजार दोन लिटर डिझेल चोरुन नेले. याप्रकरणी अॅड.अमोल बाळासाहेब साळुंके (रा.नागापूर) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Leave a comment