जिल्ह्यात आज नवे ४८ रुग्ण

 

बीड | वार्ताहर

 

 कोरोनाची तिसरी लाट धूसर झाली आहे. जिल्ह्यात आज सोमवारी केवळ ४८ नवे रुग्ण आढळून आले. दिलासादायक म्हणजे, सोमवारी अंबाजोगाई, धारूर, शिरूर व गेवराई या चार तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

 

आरोग्य विभागाच्या सोमवारच्या, अहवालानुसार, २ हजार ३५ संशयितांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये १ हजार ९८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर,४८ जण बाधित आढळून आले. नव्या बाधितांमध्ये आष्टी तालुक्यातील ३१, बीड तालुक्यातील ८,केज ३, माजलगाव २, परळी १, पाटोदा १ आणि वडवणी तालुक्यातील १ जणांचा समावेश आहे. 
दरम्यान, काल रविवारी कोरोनाने दोन मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये केज तालुक्यातील येवता येथील ५० वर्षीय पुरुष आणि शिराळा (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १०,२०१२ इतकी झाली आहे तर, बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ९८ हजार ७०२ इतका झाला आहे. आतापर्यंत २ हजार ७३१ जणांचा बळी गेला असून सध्या ५३१ रुग्ण उपचाराखाली आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.