माजलगाव, परळी, अंबाजोगाई धारूर तालुक्यात एकही नवा रुग्ण नाही

बीडवार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात येऊ लागला आहे. असे असले तरी दुसरीकडे रुग्ण मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश येत आहे.त्यामुळे दिवसागणिक मृत्यूसंख्या वाढत चालली आहे.गुरूवारी (दि.९) कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच  जिल्ह्यात ५७ नवे रुग्ण निष्पन्न झाले तर ६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

गुरुवारच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २ हजार ७५१ जणांची कोरोना चाचणी केली. यात २ हजार ६९४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ५७ नवे रुग्ण आढळून आले. नव्या बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात २३, बीड ११, गेवराई तालुक्यात २, केज तालुक्यात ८, पाटोदा ६ शिरूर १ व वडवणी तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे गुरुवारी माजलगाव, परळी, अंबाजोगाई व धारूर तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

आता बाधितांचा एकूण आकडा १ लाख १ हजार ७६० इतका झाला आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ हजार ४३१ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ हजार ७२६ जणांचा बळी गेला आहे. सध्या ६०३ रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.