गणेशोत्सवासाठी बीड पोलिस प्रशासनाची नियमावली

 

प्रत्यक्ष मंडपात येऊन किंवा मुखदर्शन घेण्यास प्रतिबंध

 

बीड | वार्ताहर

 

कोरोना संसर्गाचा तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव आरोग्याच्या दृष्टिकोनातून साधी पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने गुरुवारी (दि.९) नियमावली जारी केली. त्यानुसार आता गणपतीबाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन किंवा मुखदर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. गणपती बाप्पाचे दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्हा पोलिस प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीपनुसार, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. घरगुती व सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी असा सल्लाही पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू , संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. 

श्री गणेश मंडळांच्या मंडप डेकोरेशन सार्वजनिक वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी.तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विसर्जन मिरवणूका काढण्यास शासनाने प्रतिबंध केला आहे त्यामुळे गणेश भक्तांनी आणि सार्वजनिक मंडळाने स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. गणेश भक्तांनी व मंडळांनी पर्यावरण प्रदूषण याबाबतच्या नियमांचे पालन करावे,असेही मार्गदर्शक सूचनांत स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.