पोलिसांकडून मारहाण झालेल्या शेतकर्‍याची घेतली भेट

गेवराई । वार्ताहर

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याला झालेली मारहाण अतिशय निंदनीय आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. शेतकर्‍यांनो, तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाहीत भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी आहे असे सांगत माजी मंत्री भाजप आ. आशिष शेलार यांनी पोलिसांकडून मारहाण झालेले तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी मोतीराम चाळक व त्यांच्या कुटूंबियांना धीर दिला. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यास भाग पाडू असे त्यांनी यावेळी सांगितले.

तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी मोतीराम अच्युत चाळक हे शेतकरी बी बियाणे खरेदीसाठी गेवराई येथे आले असतांना त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीबाबत आ.लक्ष्मण पवार यांनी आवाज उठवल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.2) माजी मंत्री आ.आशिष शेलार यांना थेट किनगाव येथे मारहाण झालेले शेतकरी मोतीराम चाळक यांच्या घरी जावून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना धीर देत राज्य सरकारवर कडकडून टीका केली.

यावेळी आ.लक्ष्मण पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पं.स.सदस्या पुजाताई मोरे, सभापती दिपक सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, सरपंच अरुण चाळक, नगरसेवक भगवान घुंबार्डे, राहुल खंडागळे, भरत गायकवाड, प्रशांत राख, प्रा.येळापुरे, संजय आंधळे, लक्ष्मण चव्हाण, तात्यासाहेब चाळक यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाविकास आघाडी सरकार उलट्या पायाने चालत असून सरकारचे हित हे शेतकर्‍यांना जगवणारे आहे की, अवैधरित्या वाळू तस्करी करणार्‍या माफियांना संरक्षण देण्यात आहे असा सवालही यावेळी आ.आशिष शेलार यांनी केला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. त्यांनी रात्री दीड वाजता मला फोन करुन या विषयावर थेट शेतकर्‍याची भेट घ्यायचा आदेश दिला. यानंतर मी तातडीने या ठिकाणी दाखल झालो. शेतकर्‍याला झालेली मारहाण अतिशय दुर्दैवी असून याबाबत आपण लवकरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून मारहाण केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यास भाग पाडू असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.