वडवणी । वार्ताहर 

 

पाणी  आणि अन्नाची कमतरता यामुळे डोंगरावरील पक्षी, प्राण्यांचे, जनजीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. त्यामुळे डोंगरावरील पक्ष्यांना  अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये यावे लागत असल्याचे पाहावयास मिळते.अशाच विविध कारणांमुळे अण्णा साठी भटकंती करत असलेला राष्ट्रीय पक्षी वडवणीत तालुक्यातील रुई (पिंपळा) परिसरातील शेतामध्ये अन्न शोधत असल्याचा आढळून आला .

 मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी आहे.या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळालेली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. डोंगरावर  वावरणार्‍यांना ही पिसार्‍याची पिसे सापडतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला  त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर डोंगराच्या किंवा झाडीच्या आसपास पाहायला मिळतात.असचे एक मोराचे नृत्य वडवणी तालुक्यातील रुई (पिंपळा) येथे पहावयास मिळाले .शेतकर्‍यांना शेतात मोर सहजपणे वावरताना आढळतात.मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतात.मादीला म्हणजेच लांडोरीला नसतो. एका मोराबरोबर अनेक लांडोरी थव्याने जंगलात तसेच शेतात दाणे टिपताना आढळतात. मोराचे अन्न पाने, किडे, सरडे, साप हे आहे. मोर हा सुंदर पक्षी असून आता दुर्मीळ होत चाललेला आहे.रुई पिंळला गावच्या डोंगरावर राहणारे मोर पक्षी आता शेतात येऊ लागले आहेत. हे डोंगरावर त्यांचे अन्न-पाण्याचे शोधत आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.