बीड । वार्ताहर
जिल्हा आरोग्य विभागात तब्बल 18 वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी या पदावर दोघांची नियूक्ती झाली आहे. याशिवाय मागीतल 9 वर्षांपासून रिक्त असलेल्या माता व बालसंगोपन अधिकार्यांच्या जागीही एका महिला अधिकार्यांची नियूक्ती झाली आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अवर सचिव वि.पूं.घोडके यांनी सोमवारी आदेश काढले आहेत.
जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेत आरोग्य अधिकारी संवर्गातील अनेक महत्वाची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त होती. यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांच्याकड होता. आता या पदावर जळगाव येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जयवंत मोरे येणार आहेत. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच देण्यात आला होता. आता या पदावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख रोफ अब्दुल रहमान हे येणार आहेत. हे दोन्ही पदे जवळपास 2003 पासून रिक्त होते. त्यापाठोपाठ 9 वर्षांपासून रिक्त असलेल्या माता व बालसंगोपन पदाचा अतिरिक्त पदभार गेवराईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांच्याकडे होता. आता या पदावर पुणे येथील आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्या डॉ.स्वाती कांबळे या येणार आहेत. तीनही अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी निघाले आहेत.
Leave a comment