मागे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय आत्मकथा ’लोक माझे सांगाती’ ही पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आली होती. आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील अनेक धागेदोरे आणि कंगोरे पवार साहेबांनी लोकांसमोर  होते. त्यामध्ये पवार साहेबांनी अनेक गौप्यस्फोटही केले  अनेक पक्षांबरोबर असलेले संबंध, समविचारी, भिन्नविचारी पक्षांसोबत असलेले संबंध यावर पवार साहेबांनी भाष्य केले होते. त्यामध्ये पवारसाहेबांनी एक उल्लेख केला होता की ’वैचारिक मतभेद असले तरी सुसंवाद ठेवता येतो’ आणि हाच अनुभव पवारांच्या चाहत्यांना कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्राला वेळोवेळी येतच असतो आणि  तो आला.  पवार हे पुरोगामी विचारधारेचे असले तरी  यांच्याकडे वैचारिक ताठरपणा नसून वैचारिक लवचिकता असल्याचे वेळोवेळी दिसून येते. अगदीच भिन्नविचारी पक्षांशी किंवा भिन्नविचारी पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. अगदी त्या काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते आणि देशभरात हिंदुरुदयसम्राट म्हणून ओळखले जात होते.  हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सेक्युलर असणार्‍या पवार साहेबांचे अगदी  संबंध होते आणि पवार साहेब वेळोवेळी आपली मैत्री निभवण्यासाठी मातोश्रीवर जात असत आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत त्यावेळी त्यांना जर का पत्रकाराने विचारलं की तुम्ही अगदी आपल्या कट्टर राजकीय विरोधकाशी किंवा भिन्न विचारी पक्षाच्या नेत्यांशी तुम्ही भेटीगाठी  काय घेतात.  त्या वेळी ते सांगत की

 

ज्यावेळी मी मातोश्रीवर  त्यावेळी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शरद पवार यांना अनेक सभांमध्ये शेलक्या विशेषणांचा वापर करत असत. बारामतीचा म्हमद्या, मैद्याचं पोतं असे अनेक शिवराळ शब्दप्रयोग शरद पवारांच्या बाबतीत करण्यात येत असत. त्यावेळी महाराष्ट्राच्या सत्ताकारणांमध्ये शरद  यांचं मोठं वर्चस्व होतं आणि अशा शरद पवारांवर टीका केल्याशिवाय बाळासाहेब  यांच्या सभेला मजा येत नसे. परंतु तरीसुद्धा शरद पवार बाळासाहेबांना खिलाडूवृत्तीने घेत असत आणि मैत्री मैत्रीच्या जागेवर आणि राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवत असत बाळासाहेब ठाकरेही मोठ्या मनाने शरद पवारांचा सन्मान करत असत. शरद पवार जरी सेक्युलर विचारधारेचे  तरी त्यांच्याकडे वैचारिक लवचिकता आहे आणि या वैचारिक लवचिकतेचे मुळेच भिन्न विचारी  अगदी हिंदुत्ववादी पक्षांसोबत सरकार बनवून ते टिकवण्याची किमया शरदराव पवार यांनी करून दाखवली आहे. राजकारणात वैचारिक लवचिकता असलीच पाहिजे तरच सत्ताकारण जुळवता येत,  हे तात्कालिन अटल बिहारी वाजपेयी सरकारने दाखवून दिलं आहे. अगदी टोकाच्या भिन्न विचारधारा  तरी सुसंवाद साधला गेला पाहिजे याचाच आणखी एक उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग सरकारमध्ये  पवार देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना भेटण्यास गुजरातमध्ये जात असत. काँग्रेसचे निर्बंध झुगारून शरद पवार मोदींशी मैत्री जोपासत असत. त्या वेळी काँग्रेसचे  भाजपचे विळा भोपळ्याचे नाते होते. तरीसुद्धा काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीतील एका घटक पक्षाचा मंत्री  मुख्यमंत्र्याकडे भेटायला जातो हे काँग्रेससाठी आणि राहुल गांधींसाठी त्यावेळी अवघड जागचे दुखणे झाले होते. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर अनेक आक्षेप घेतले होते तरीही त्या आक्षेपांना न जुमानता शरद पवार हे नरेंद्र मोदी असतील  भाजपचे अनेक नेते असतील यांच्याशी संबंध जुळवूनच राहिलेले पाहायला मिळते . सांगायचं तात्पर्य असं की  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीची मोठी बातमी झाली. बातमी होणे हे स्वाभाविकच आहे. कारण राज्यात राजकीय अस्थिरता असलेले सरकार  आहे. राजकीय अस्थिरता असेल तर सरकारला निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतात किंवा वेळ तरी लागतो. तीन  मिळून सरकार बनवल्यामुळे कोणता पक्ष कधी पाठिंबा काढून घेईल. कोणता पक्ष कुठल्या मागण्या करील यामुळे एक राजकीय अस्थिरता महाराष्ट्रात दिसत असते आणि मग या भेटीगाठी यांना महत्त्व प्राप्त होतं. मागे काही दिवसांपूर्वी  पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची गुजरातमधील अहमदाबाद मध्ये भेट घेतली होती. त्या भेटीची अशीच बातमी  होती परंतु ही भेट गुप्त होती. पण आता शरद पवार आजारपणानंतर अनेक दिवसानंतर राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळाले. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय  भुवया उंचावल्या आहे त्याच्यामागचे कारण हे ही तितकच महत्त्वाचं आहे. गेल्या महिन्याभरात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये यादवी माजल्याचे पाहायला  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर आवाज चढवून बोलल्याचे किसे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण शमवण्यासाठी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी थेट मातोश्रीवर धाव घेतली होती. परंतु तेथील वाटाघाटींमध्ये उद्धव ठाकरे  नाराजी समोर आली होती. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की महाविकास आघाडी सरकार टिकवणे एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही त्यामुळे  नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. कारण ज्यावेळी शरद पवार आणि भाजपच्या नेत्यांच्या  भेटी किंवा राजकीय गुप्त भेटी होतात त्यावेळी शिवसेनेला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे परंतु शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जरी  वरवर सदिच्छा भेट वाटत असली तरी आतमध्ये काहीतरी शिजलं आहे ते समजायला जनता दुधखुळी नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता वाढू लागली आहे. अस्वस्थताही तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढू लागली  मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द ठरविण्यात आल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेला इशारा दिला होता. वेळप्रसंगी  बाहेर पडू असा तो इशारा होता . नाना पटोले यांनी म्हटले होते की सत्ता हे काँग्रेसचे अंतिम ध्येय नाही त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता लपून राहिलेली नाही . महाविकास  काँग्रेसला मोठं नुसकान होणार असल्याचं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्षात आलं असून वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसला फटका बसला आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेमध्ये किती काळ  हे कोणीही सांगू शकत नाही. काँग्रेसच्या कार्यपद्धती प्रमाणे आदेश आल्यानंतर काँग्रेस सरकार बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते परंतु राष्ट्रवादीचे गणित वेगळं आहे .   राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा  चा फॉर्म्युला  ठरला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवं आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील अनेक नेत्यांना मंत्रीपदी  अनेक सहकार सम्राटांना नामदार बनवलं.  अनेक आमदारांना कॅबिनेट मंत्री केलं . राज्यमंत्री केलं परंतु स्वतःच्या कन्या सुप्रिया सुळे यांना ते मुख्यमंत्री करू शकले नाही याची  शरद पवार यांना वेळोवेळी मनात खात असते. त्यामुळे शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं असल्यामुळे शिवसेनेवर एक दबावतंत्राचा वापर शरद पवार करत  परंतु हे दबावतंत्राचा हुकमी एक्का चालला नाहीतर शरद पवार सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तात्काळ घेऊ शकतात त्यानंतर भाजपा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करेल असे सध्या  वाटत नाही कारण भाजपला ओसाड गावची पाटिलकी नको आहे त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या राज्याचे नेतृत्व करणे भाजप नेत्यांना सध्या जास्त चांगले आणि हिताचे वाटत नाही.  महाराष्ट्रात हे सरकार पडल्यानंतर थेट निवडणुका होऊ शकतात यामध्ये तीन पक्षांमध्ये एकमेकांची खेचत स्पर्धा असल्यामुळे याचं मोठं नुसकान शिवसेनेला होणार आहे . त्यामुळे  देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीवर चर्चा होणे स्वाभाविकच आहे . त्या एक तास झालेल्या भेटीमध्ये नेमकं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा  ही प्रश्न अनुत्तरीत असले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी झालेली भेट ही फक्त एक सदिच्छा भेट होती अशी  दिली आहे आणि शरद पवार यांनीही ही प्रतिक्रिया दिली तरीसुद्धा या भेटीमध्ये काय शिजलं याची उत्सुकता माध्यमांना आणि राज्यातील जनतेला लागून राहिली आहे ही भेट गुप्त नसली  असली तरी या भेटीतील मुद्दे मात्र गुप्तच आहेत ते लवकरच पुढे आल्यानंतर महा विकास आघाडीचे भवितव्य ठरेल.

 


लेखक- दत्ता पवार

(लेखक हे पत्रकार आणि राजकीय अभ्यासक आहेत) 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.