84 दिवसांनंतरच मिळणार Covishield चा दुसरा डोस

CoWIN पोर्टलमध्येही होणार बदल

 

मुंबई : 

 

यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने कोरोना काळात महत्त्वाच्या सुचना जारी केल्या आहेत. UIDAI म्हणण्यानुसार ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना वॅक्सिन, औषधं किंवा आत्यावश्याक कामांसाठी नकार दिला जाणार नाही. असं स्पष्टीकरण यूआयडीएआयने (UIDAI) दिले आहे. काही लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लसीकरण आणि इतर आत्यावश्याक कामांसाठी अडथळे येत असल्यामुळे UIDAI हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना काळात प्रत्येकाला आवश्यक सुविधा मिळणं फार महत्वाचं आहे, कोणाकडेही आधार उपलब्ध नसेल तरी त्यांना सर्व सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात भरतीही होता येईल. असं UIDAIने सांगितलं आहे. 

आधारकार्ड नसल्यामुळे एखाद्याला आवश्यक वस्तू मिळत नसल्यास किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास काही अडथळे येत असतील तर  एजन्सी किंवा विभागास आधार अधिनियम, 2016 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार त्याला सेवा द्यावी लागेल. असं देखील UIDAIने सांगितलं आहे. 

 

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे.तसेच, 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असेही जारी करण्यात आले होते, की आधारमुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होणार नाही. त्यामुळे कोरोना काळात जरी आधारकार्ड काही कारणांसाठी नसेल, तरी सर्व अत्यावश्यक सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

 

84 दिवसांनंतरच मिळणार Covishield चा दुसरा डोस

CoWIN पोर्टलमध्येही होणार बदल

 

 

कोरोना व्हायरसविरोधातलसीकरणा दरम्यान  आता कोविशिल्ड वॅक्सिनसाठी 12 आठवड्यांनंतरच अपॉईंटमेंट मिळेल. केंद्राने रविवारी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट 84 दिवसांनंतरच दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय, ज्या लोकांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी आधीच आपली अपॉईंटमेंट बुक केली असेल, तर त्यांच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. जर अपॉईंटमेंट बुक झाली असेल, आणि कोणाला 84 दिवसांप्रमाणे बदल करायचा असल्यास, ते करू शकतात.

कोविशिल्ड वॅक्सिनच्या दोन डोसदरम्यान वाढवलेल्या वेळेदरम्यान आता कोविन पोर्टलमध्येही बदल केले जाऊ शकतात. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, कोविन डिजीटल पोर्टलमध्ये आवश्यक ते बदल केले जात आहेत, जेणेकरुन कोविशिल्डच्या दोन डोसमधील 12 ते 16 आठवड्यांमधील अंतर तेथे दाखवलं जाऊ शकेल. या निर्णयाच्या आधीपासून दुसऱ्या डोससाठीची घेतलेली ऑनलाईन अपॉईंटमेंट मान्य असेल, ते कोविन अ‍ॅपद्वारा रद्द केलं जाणार नाही.

गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, मार्चमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवसांवरुन 6 ते 8 आठवडे करावं असं सांगितलं होतं.

परंतु कोरोना वॅक्सिनच्या कमतरतेदरम्यान, लसीकरणावर गठित सरकारी पॅनल, नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप अर्थात NTAGI ने लशीबाबत काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. भारत सरकारने आता या सरकारी पॅनलच्या सल्ल्यानुसार, कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांनी वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, NTAGI पॅनलद्वारा कोवॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत कोणताही बदल सुचवला नाही.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.