नवी दिल्ली :

पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर ते पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करतील. या कार्यक्रममध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम मिळेल. नरेंद्र मोदी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी रुपये वर्गत करतीलय  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14 हजार मिळाले आहेत. 

ट्वीट करुन दिली माहिती

 

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर  यांनी असं ट्वीट केलं आहे की, 'पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मो 2020 रोजी सकाळी PM Kisan योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 19000 कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करतील.' या लाइव्ह इव्हेंटची लिंक देखील तोमर यांनी या ट्वीटमध्ये शेअर केली आहे. pmevents.ncog.gov.in लाइव्ह कार्यक्रमासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता. हे पैसे डीबीटीच्या  माध्यमातून अर्थात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहे.

 

 

10 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.

 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?

 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.

 

तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?

 

सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.

तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.

:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.

जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.

 फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

 पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.

 

 

योजनेसाठी करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वत: या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता.-याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल

 

कोण आहेत अपात्र शेतकरी?

-संस्थात्मक शेतकरी

-असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी

-घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.

-केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.