राज्य सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता

 

 

मुंबई   । वार्ताहर

 

 राज्यातील कोरोनाच्या  वाढत्या प्रसाराबाबत आणि उपाययोजनांबाबत नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद  घेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील लसीच्या तुटवड्याच्या  पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे. जोपर्यंच मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत 18 ते 45 वयोगटातील सर्वांना सर्रास लस देणं शक्य नसल्यास त्यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर वयोगटानुसार स्लॉट देण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आज दीड वाजतापासून मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली जात आहे. यात 35 ते 44 या वयोगटातील लोकांना आणि विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना प्राधान्यानं लस देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

18 ते ४४ या वयोगटातील लोकांसाठी केवळ ७ लाख ७९ हजारच लसी उपलब्ध झाल्यानं लसीकरण संथ गतीनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अधिक लसी उपलब्ध होताच गती वाढवण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ४५ वर्षावरील लोकांसाठी ९ लाख व्हॅक्सिन मिळाल्या. त्याचं वाटप झालं आणि ८ लाख लसींचा वापरही झाला. आता काही हजारच लसी ४५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी शिल्लक आहेत. यासंदर्भात केंद्राला वारंवार पत्र लिहित आहोत. केंद्रानं दबाबदारी घेतलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी तरी लस उपलब्ध करुन द्या, अशी मागणी टोपे यांनी केली.

टोपे म्हणाले, ४५ वर्षावरील व्यक्तींमध्ये की ४ ते ५ लाख लोकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणं बाकी आहे. साठ दिवसाच्या आत हा डोस देणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं यासाठी लवकर मदत करावी, अन्यथा पहिल्या डोसचा प्रभावही होणार नाही

 

लसीकरणासाठी शहरी नागरिक ग्रामीण भागात

 

१८ ते ४४ वयोगटासाठी ग्रामीण भागातल्या केंद्रांवर त्याच भागातले लोकं न जाता मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतलं. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल.

राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक व्ही लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र प्रथम आहे. महाराष्ट्राने १ कोटी ७३ लाख नागरिकांचं लसीकरण केलं. परंतु कोवॅक्सिनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. केंद्राला पत्र लिहून लसींची मागणी करत आहोत, असं देखील टोपे म्हणाले.

त्याबाबत दीड वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं म्हत्त्वाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न 

अठरा वर्षाहून लहान वयोगटातील मुलांच्या अनुषंगाने लागणारे बेड्स, व्हेंटिलेटर, तसंच वेगळ्या टाईपचे बेड तयार केले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी रात्री दहा वाजता याबाबत चर्चा केली आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. बेड वाढवण्यासाठी, ऑक्सिजन, औषधाबाबती स्वयंपूर्ण होण्यासाठी पूर्ण तयारी सुरू. तिसऱ्या लाटेच्या अंदाजाच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेण्यासंदर्भात सातत्यानं तयारी सुरू आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

सोबतच राज्याचा रिकव्हरी रेट ८५.५५ टक्क्यांवर पोहोचला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय राज्याची १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज केंद्रानं भागवावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.