तुटवडा कायम: जिल्ह्यात 18 ते 44

वयोगटातील लाभार्थी वेटींगवरच

 

बीड | वार्ताहर

 

महाराष्ट्र दिनापासून राज्यात वय वर्ष 18 ते 44 या गटातील लाभार्थ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र या वयोगटासाठी जिल्ह्यात पाहिजे तितक्या प्रमाणात लशींचे डोसच उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे कोविन डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करूनही लसीकरणासाठी शेड्यूल्ड अथवा अपॉईन्मेंट मिळत नसल्याने म्हणजेच लशींचे डोसच शिल्लक नसल्याने अनेकांना लस मिळत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. शिवाय जिल्हा रूग्णालय असो की अन्य ठिकाणचे लसीकरण केंद्र सर्वच ठिकाणी दिवसात 200 जणांची बुकींग झाली की इतरांना लस मिळत नाही. सरकारने लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी बंधनकारक केली आहे तर लसी करणासाठीची अपॉईन्मेंट तात्काळ का मिळत नाही असा रोकडा सवालही तरूणांनी आरोग्य विभागाना केला आहे.

बीड जिल्ह्यात सध्या 18 ते 44,  45 ते 60 व 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना भारत बायोटेकची कोव्हिशिल्ड आणि सिरम इन्स्ट्यिुटची कोव्हॅक्सीन ही लस दिली जात आहे. 1 मे पासून बीड जिल्ह्यात मोजक्या 5 केंद्रावर 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांनाही लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु या पाच केंद्रावर दररोज केवळ 200 जणांनाच लस मिळत असल्याने तेही ऑनलाईन बुकींग केल्यानंतर त्यामुळे इतरांना मात्र लसीसाठी प्रतिक्षेतच थांबावे लागत आहे. दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्याला वय वर्ष 18 ते 44 साठी साडेबारा हजार डोस उपलब्ध झाले. तसेच 45 वर्षावरील वयोगटासाठी 44 हजार लसींचे डोस प्राप्त झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 600 तर ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयासाठी 1 हजार डोस वाटप करण्यात आले. 

 

 

 18 ते 44 या वयोगटाच्या लसीकरणासाठी धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा आणि माजलगाव हे पाच केंद्र वाढविण्यात आले. यापूर्वी 1 मे पासून बीड, अंबाजोगाई, आष्टी, परळी आणि गेवराई हे पाचच केंद्र कार्यान्वित होते. असे असले तरी सध्या सर्वच लोक लस घेण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु लसीकरण केंद्रावर ऑनलाईन बुकींग केलेले व बुकींग न केलेले लोकही गर्दी करत आहेत. त्यातच जिल्ह्याला पाहिजे तितक्या प्रमाणात लसींचा पुरवठा झाला नसल्याने अनेकांना लस मिळू शकलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आरोग्य विभागाने केवळ 18 ते 44 या वयोगटासाठी ऑनलाईन बुकींग नंतरच लस मिळेल हे जे बंधन घातले आहे ते बरोबर असले तरी नोंदणी होईल तितक्या प्रमाणात दररोज लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्विकारावी व या संबंधीचे नियोजन करावे अशी मागणी होत आहे.

 

 

लशीसाठी नोंदणी कशी करायची?

कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.

नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.

 

वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.

त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.