IPL 2021 रद्द

उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

 

बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय, अनेक संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण

 

 

नवी दिल्ली

कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. अनेक संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना महामारीदरम्यान बीसीसीआयने ‘बायो-बबल’चा हवाला दिला होता, यानंतर 29 सामने यशस्वीरीत्या पार पडले. चेन्नई आणि मुंबईतील सर्व सामन झाले. परंतु अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या हंगामाील 30 वा सामना होऊ शकला नाही.

याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाताचा सामना रद्द करण्यात आला आहे. आजच्या सामन्यावर सुद्धा कोरोनाचे संकट ओढावले होते. पण योग्य ती खबरदारी घेत, सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

 

बीसीसीआय आयपीएल मुंबईत हलवण्याच्या तयारीत होतं 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत होतं. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाणार होते.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका

आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. करोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसंच आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर करोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

चेन्नई-कोलकात्यापाठोपाठ SRH आणि

दिल्लीच्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण

 

चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचं चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवलं होतं. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.

आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.