जिल्ह्यात 1145 नवे रुग्ण 947 जणांना सुटी 

बीड । वार्ताहर

कोरोनाच्या मृत्यूचे सत्र जिल्ह्यात कायम आहे. याबरोबरच रुग्णसंख्याही वेगाने वाढत चालल्याचे चिंता व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यात तब्बल 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. तसेच 1145 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर  947 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरही दिवसेंदिवस ताण वाढत चालला आहे.
बुधवारी (दि.21) जिल्ह्यात 4 हजार 690 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यातील 3 हजार 545 जण निगेटिव्ह आले तर एक हजार 145 जणांचे अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले. बीडमध्ये सर्वाधिक 226 आढळून आले, अंबाजोगाई 205, आष्टी 138,धारुर 43,गेवराई 116,केज 119,माजलगाव 65,परळी 77,पाटोदा 91,शिरुर 33,वडवणी 32 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 947 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. तसेच गुरुवारी 21 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात वकीलवाडी (ता.केज) येथील 74 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष बीड,70 वर्षीय पुरुष चर्‍हाटा (ता.बीड), 40 वर्षीय पुरुष बकरवाडी (ता.बीड),65 वर्षीय पुरुष गावंदरा (ता.धारर),48 वर्षीय पुरुष नेकनूर (ता.बीड),72 वर्षीय पुरुष भगवान विद्यालयाजवळ बीड, 65 वर्षीय महिला एकनाथनगर बीड,65 वर्षीय महिला चकलांबा (ताग़ेवराई),54 वर्षीय पुरुष विद्यानगर बीड,65 वर्षीय पुरुष टाकळी देशमुख (ता.परळी),70 वर्षीय पुरुष लऊळ (ता.अंबाजोगाई),50 वर्षीय पुरुष मंगरुळ क्र.2 (ता.माजलगाव), 75 वर्षीय महिला जिरेवाडी (ता.परळी), 20 वर्षीय तरुण नीमगाव (ता.बीड),70 वर्षीय महिला परळी, 60 वर्षीय महिला गेवराई, 68 वर्षीय पुरुष गांधीनगर बीड,55 वर्षीय महिला जुना बाजार बीड, 50 वर्षीय पुरुष पिंपळनेर (ता.शिरुर) व 67 वर्षीय पुरुष वहाली (ता.पाटोदा) यांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 43 हजार 650 इतकी असून यापैकी 37 हजार 646 जणांनी कोरोनावर मात केली तर एकूण बळींचा आकडा 792 वर पोहोचला.सध्या 5 हजार 212 जण उपचार घेत असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.