नागरिकांनी गर्दी करू नये,सर्व पात्र व्यक्तींना लस मिळणार : अनिल ढोबळे
आष्टी : प्रतिनिधी
कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा सर्वत्तम पर्याय असुन कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास महिनाभरापासून लसीकरण सुरू आहे.मात्र मागील तीन चार दिवसांपासून नागरिक लस घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.सर्व पात्र व्यक्तींना लस मिळणार असून एकाच दिवशी गर्दी न करण्याचे आवाहन सरपंच अनिल ढोबळे यांनी केले आहे.
कडा येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल आरबे,डॉ.दत्तात्रय जोगदंड व सर्व आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी मेहनत घेत आहेत.गर्दी टाळण्यासाठी आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेली आहेत प्रत्येक सत्राची उपलब्ध लस साठा याची माहिती प्रदर्शनीय भागात लावण्यात येईल.
गर्दी टाळून सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टी कोणाने नवीन टोकण सिस्टम तयार करण्यात आली आहे.एका व्यक्तीला एकच टोकण देण्यात येईल, व टोकण देण्यापूर्वी आधार कार्ड इत्यादी सरकारी ओळख पत्र तपासण्यात येतील.एका वेळी 10 टोकण धारकांना लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल व जमा केलेले टोकण निर्जंतुक करून पुन्हा वापरण्यात येतील.आष्टी तालुक्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, व ग्रामीण रुग्णालय अशा या 6 आरोग्य संस्था मध्ये लस उपलब्ध झाली असून एकाच आरोग्य संस्था मध्ये गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येते. नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून, या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन अनिल ढोबळे यांनी केले आहे.
सध्या कोरोनाची भयंकर अशी लाट आली असुन त्यासाठी कडा ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी नागरिकांना मदत करत आहेत.गर्दी होऊ न देण्यासाठी दिवसभर शहरात लाऊडस्पीकर वर आवाहन करत आहेत.शिवाय सरपंच अनिल ढोबळे स्वतः दिवसभर आरोग्य केंद्रात लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Leave a comment