मराठवाड्यातील आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा
माजी मंत्री क्षीरसागरांनी घेतली मंत्री टोपे, शिंगणे यांची भेट
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यला 900 रेमडेसिव्हर मिळाले
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील आरोग्य विषयक प्रश्नावर आज गुरुवारी (दि.22) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात तसेच बीड जिल्ह्याला रेमडेसिव्हर आणि ऑक्सिजनचा पुरवठा आणि आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्री टोपे व औषध पुरवठा मंत्री शिंगणे यांच्याकडे आग्रहाची मागणी केली. तसेच आजच बीड जिल्ह्यासाठी 900 रेमडेसिव्हर मिळाले असून आणखी 3 हजार इंजेक्शन तातडीने द्यावेत जेणेकरून रुग्णांना वेळेत उपयोग होईल असे सांगितले. यावेळी,आरोग्य सचिव व्यास, औषध प्रशासनाचे सचिव परविंदर सिंग हापकिनचे प्रमुख रामास्वामी, तसेच वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ आदि उपस्थित होते.
Leave a comment