ऑक्सिजन लिक्वीड अधिकचे मिळण्यासाठी
मंत्री धनंजय मुंडे, अजितदादांकडे पाठपुरावा
बीड । वार्ताहर
कोरोना संसर्गाने बीड जिल्हा रूग्णालयासह खासगी कोव्हिड रूग्णालयात रूग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. असे असतांना इतर जिल्ह्यात नियमबाह्यपणे ऑक्सिजन दिल्या जात असल्याच्या तक्रारी आ.संदिप भ क्षीरसागर यांच्या कानी आल्या. जिल्हा रूग्णालयात काल मध्यरात्री ऑक्सिजन संपण्याची परिस्थिती असतांना ही जिल्हा रूग्णालयातील गंभीरता ओळखून 200 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर त्यांनी जिल्हा रूग्णालयात आणून दिले. एवढेच नव्हे तर बीडमधील खासगी कोव्हिड रूग्णालयातही आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता लिक्वीड ऑक्सिजन जास्त मिळावा यासाठी आ. क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आधिकचे ऑक्सिजन लिक्वीड बीड जिल्ह्याच्या पदरी पाडून घेतले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाने रूग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्हा रूग्णालयासह खासगी कोव्हिड रूग्णलयातही मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहे. सर्वांनी मिळून हे कोरोना संकट हरवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून आ. क्षीरसागर आपल्या यंत्रणेसह जिल्हा प्रशासन, रूग्णालय प्रशासन, रूग्णांच्या नातेवाईकांना आधार देत मदत करत आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर ऑक्सिजन लिक्वीड बीड जिल्ह्यासाठी अधिकचे मिळावे यासाठी आ.त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील कंपण्यांशी पाठपुरावा करत अधिकचे ऑक्सिजन लिक्वीड बीड जिल्ह्याच्या पदरी पाडून घेतले आहे. बीडजवळ असलेल्या कुमशी फाटा येथील दोन्ही ऑक्सिजन पुरवठा करणार्या कंपन्यांमधून जिल्हा रूग्णालय व खासगी कोव्हिड रूग्णालय येथे ऑक्सिजन पुरवठा सिलेंडरच्या माध्यमातून केला जाणार आहे. ऑक्सिजनचा काळा बाजार होवू नये यासाठी आ.संदिप क्षीरसाागर यांनी आपली यंत्रणाही कामाला लागली आहे. दरम्यान बीड येथील कोणत्याही खासगी कोव्हिड रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासल्यास अथवा काही अडचणी आल्यास थेट संपर्क करा असे आवाहनही आ. क्षीरसाागर यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
रूग्णांची आर्थिक पिळवणूक करु नका
जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्ण शासकीय व खासगी कोव्हिड रूग्णालयात उपचार घेत आहेत. हे उपचार घेत असतांना रेमडिसीवर इंजेक्शन काळ्या बाजारातून विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच जादा बील आकारले जात असल्याचेही रूग्णांकडून सांगितले जात असून यावर रूग्णालय प्रशासनाने देखिल रूग्णांची आर्थिक पिळवणूक करू नये. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रूग्णांचे बील घ्यावे अशी विनंतीही आ.संदिप क्षीरसागर यांच्या यंत्रणेकडून करण्यात येत आहे
Leave a comment