20 सामाजिक संघटनांचा प्रतिसाद 

बीड, गेवराई, माजलगाव शहरामध्ये होणार शिबीरे

बीड । वार्ताहर

महाराष्ट्र राज्यात व आपल्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यानुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सामाजिक संघटनांची बैठक घेऊन नियोजन करण्याचे निर्देश अतिरीक्त जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांना दिले. त्यानुसार बुधवारी (दि. 7) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये रोटरी क्लबच्या सर्व संघटना, महाविद्यालयांचे प्रतिनिधी इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीस  अतिरीक्त जिल्हाधिकारी  ठोंबरे, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डॉ.जयश्री बांगर, अपत्ती विभाग प्रमुख उमेश शिर्के उपस्थित होते.

त्यानुसार अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सामाजिक संघटना व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन आवाहन केले. उपस्थित पदाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवार पासून बीड शहात दोन ठिकाणी, गेवराई, माजलगाव या तीन शहरांमध्ये रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवण्यात आले आहे. बीड शहरातील माँ वैष्णव पॅलेस येथे 9 ते 16  एप्रिल 2021 पर्यंत रक्तदान सप्ताह शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे. मा.जिल्हाधिकारी व  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांच्या सुचनेनुसार कोव्हीड -19 महामारीच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार रक्तदान शिबीरे घेण्याचे नियोजन केले जात आहे. सदरील बैठकीमध्ये डॉ. जयश्री बांगर (विभागीय रक्त संक्रमण अधिकारी व रक्त पेढी प्रमुख जी.रु. बीड) यांनी सर्व रक्तदान शिबीर आयोजकांना शासनाच्या रक्तदान शिबीर मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी उपस्थितांना पुढीलप्रमाणे, आवाहन केले होणार्‍या रक्तदान शिबिरात उस्फुर्तपने सर्व नियम व अटी पाळून सहभाग नोंदवावा. पुढील प्रमाणे संघटना रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार मोरया प्रतिष्ठान बीड : अमर नाईकवाडे, भारतीय जैन संघटना : नितीन कोटेचा, आशीश जैन, राजस्थान सेवा समाज बीड : रामेश्वर कासट, ओमप्रकाश जाजू,  होलसेल रिटेल किराणा असोसिएशन : जवाहरलाल कांकरिया, बीड जिल्हा माहेश्वरी सभा : गोपाल कासट,  बीड तहसील माहेश्वरी सभा : गिरीश सोहनी, हेमंत बियाणी, बीड तालुका व्यापारी महासंघ : अशोक शेटे, वैष्णव देवी मंदिर संस्थान : संजय सोहनी, शिवप्रसाद दायमा, रामदेव बाबा मंदीर संस्थान : डी.एम. सारडा, जगदीश सिकची, विप्र समाज संघटना : अशोक तिवारी, फामजी पारीख, भरत पटेल, पवन शर्मा, शाम पारीख,  एम.आर.संघटना, बलभीम महाविद्यालयात रासेयो, केएसके महाविद्यालय रासेयो, बंकटस्वामी महाविद्याल रासेयो, इतर नागरिक व संघटनांचे संघटनांचा समावेश असेल. 

नागरिकांना  रक्तदान करण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे

दि. 9 एप्रिल 2021 :

ठिकाण : बलभीम नगर पेठ बीड : धनराज धन्वे : 8180848403,

दि. 10 एप्रिल 2021 :

ठिकाण : बालेपीर,बीड : प्रशांत घुगरे 9834287462,

 

गेवराई : प्रसाद जोशी : 9423757485,

काळा हनुमान ठाणा, बीड  : शहनवाज खान : 909797760,

दि. 11 एप्रिल 2021 : ठिकाण :बेदरे लॉन्स

गेवराई : सुरेश बरगे : 9326262585,सम्राट चौक, बीड : हर्षवर्धन जाधव : 9049838382,

दि. 12 एप्रिल 2021 : तकीया मसजीद : सय्यद खिजर

9405066270, नागोबा गल्ली बीड : आदित्य जोगदंड  : 9923816006, दि.

18 एप्रिल 2021 ठिकाण: वैष्णवी मंगल कार्यालय, माजलगाव : अशोक मगर :

7774020407

बीड शहरातील सर्व रोटरी क्लब व सर्व व्यापारी संघटना  यांचे संयुक्त विद्यमाने  माँ वैष्णव पॅलेस,बीड येथे रक्तदान सप्ताह दिनांक 9/04/2021 ते 16/04/2021

रक्तदान  करण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे बीड जिल्हा व्यापारी महासंघ : संतोष सोहणी : कार्याध्यक्ष बीड जिल्हा : 7875717777, बीड शहर व्यापारी महासंघ :

विनोद पिंगळे : शहाराध्यक्ष :9420018151, रोटरी क्लब बीड : सुनील खंडागळे : 8668516615, रोटरी क्लब ऑफ मीट टाऊन : राहुल तांदळे :  9822777485 

रोटरी क्लब ऑफ सिटी : सुजीत सुर्यवंशी : 8892171819,  रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल : सुशील अब्बड : 9405051851 यांच्याकडे  रक्तदात्यांनी संपर्क साधावा

रक्तदात्यांना आयोजकांनी दिलेल्या वेळेलाच रक्तदानास यावे जेणेकरून कोविड-19 नियमांचे सर्व पालन होईल.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.