डॉ.सुदाम जरे व डॉ. शरद मोहोरकर यांचा प्रेरणादायी उपक्रम
आष्टी । वार्ताहर
तालुक्यामध्ये दोन डॉक्टरांनी शहरात प्रॅक्टिस करण्याबरोबर आपल्या गावाकडीला लोकांची आरोग्याची काळजी घ्यावी या हेतुने डॉ.सुदाम जरे व डॉ. शरद मोहोरकर या दोन एमडी डॉक्टरांनी गावाकडील कोरोनाच्या दुसर्या लाटेची भयावह परिस्थिती पाहता आपल्या स्वतःचे दोन कोविड सेंटर आष्टी शहरात सुरू करून गोरगरीब रुग्णांना आधार देण्याचे काम केले आहे .
कोरोनाची दुसरी लाट पाहता फार मोठ्या प्रमाणावर शहरासह खेडोपाडी बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण तयार झाले आहे शहरांमध्ये सरकारी कोविड सेंटर अपुरी पडत लागल्याने आष्टी तालुक्यातील मातकुळी गावचे रहिवासी नगर येथे मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणारे डॉक्टर सुदाम जरे तसेच आष्टी तालुक्यातील गनगेवाडी येथील डॉक्टर शरद मोहोरकर या दोन्ही उच्चशिक्षित डॉक्टरांनी शहरांमध्ये आपली दोघांची वेगवेगळी कोविड सेंटर सुरू केल्याने आष्टी शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी नगर बीड ला जाण्याचे गरज राहीली नाही या दोन्ही कोविड सेंटर मध्ये गोरगरीब पेशंट असेलतर त्या रुग्णांना त्याच्या परीस्थीतीची जाण ठेऊन त्यांना आल्पदरात उपचार देण्यात येत आहे. हे दोघे डॉक्टर करत आहेत शहरांमध्ये अव्वाच्या सव्वा बिले करून कोरूना रुग्णांनाची लुट होते मात्र शरद मोहरकर व सुदाम जरे यांनी आपले ही या मातीशी काहीतरी नाते आहे आपण याचे काहीतरी देणे करी आहोत या उदात्त भावनेतून रुग्णांची सोय केली आहे. या बद्दल सर्वत्र त्याच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
Leave a comment