बीड । वार्ताहर

 

गेल्या पंचवीस वर्षापासून गजानन नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले मन्मथआप्पा स्वामी साहेब यांचे आज सकाळी सात वाजता सोलापूर येथे दुःखद निधन झाले स्व काकू आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते

बीड येथील श्री गजानन नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मन्मथ आप्पा स्वामी साहेब गेल्या पाच ते सात दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे सोलापूर येथे उपचार घेत होते मात्र आज सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली,मन्मथ  आप्पा स्वामी हे सर्वप्रथम भूविकास बँकेमध्ये मॅनेजर पदावर काम करत होते त्याच वेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच सहा महिने अगोदर गजानन नागरी सहकारी बँकेत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी दिली बँकेच्या प्रगतीमध्ये स्वामी यांचा खूप मोठा वाटा आहे गोरगरिबांना आर्थिक सहाय्य देण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला या बँकेच्या प्रगतीसाठी हातात परिश्रम जवळपास एकशे वीस कोटी रुपयांचा व्यवसाय बँकेचा झाला आहे,आज बँकेच्या पाच शाखांचा विस्तार झाला असून तीन शाखा लवकरच सुरू होणार आहेत, स्व काकू आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती बँकेच्या कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध निर्माण केले होते बँकेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता, बँकेच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे अमुल्य असे योगदान होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेनी मागील वर्षात राज्यशासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले.शिस्तबद्ध व नियोजनबद्ध असा त्यांचा कारभार होता,दोन दिवसापूर्वीच माजी मंत्री क्षीरसागर यांनी त्यांना दूरध्वनीवर संपर्क करून चौकशी केली होती मात्र आज सकाळी 7 वाजताच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.