कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या
बीड । वार्ताहर
कोरोनाचे मृत्यूसत्र जिल्ह्यात सुरुच आहे. शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झालेली असतानाच शनिवारी आणखी 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. तसेच जिल्ह्यात पहिल्यांच एक दिवसात 434 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 327 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 2 हजार 959 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी 2 हजार 525 अहवाल निगेटिव्ह आले तर 434 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 112, बीड 95, आष्टी 63, धारुर 4, गेवराई 13, केज 22, माजलगाव 30, परळी 54, पाटोदा 23, शिरुर 12 आणि वडवणी तालुक्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान शनिवारी जिल्ह्यात बारा जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात जुन्या पाच मृत्यूसह पात्रुड (ता.माजलगाव) येथील 75 वर्षीय पुरुष,ममदापूर (ता.परळी) येथील 75 वर्षीय पुरुष, बीड शहरातील नगर रोड येथील 65 वर्षीय पुरुष, व बालेपीर येथील 75 वर्षीय पुरुष, बोधीघाट अंबाजोगाई येथील 63 वर्षीय पुरुष, हनुमान चौक माजलगाव येथील 70 वर्षीय पुरुष व साळेगाव (ता.केज) येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.तसेच 327 जण दिवसभरात कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता एकूण बाधितांची संख्या 26 हजार 714 एवढी झाली आहे. पैकी 24 हजार 161 कोरोनामुक्त झाले असून 655 जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Leave a comment