नऊ जणांचा मृत्यू;325 नवे रुग्ण
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग वाढत असतानाच बुधवारी एकाच दिवशी नऊ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. बुधवारी 325 नवे रुग्ण आढळून आले तरी, 223 जणांनी कोरोनावर मात केली त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
मंगळवारी जिल्ह्यात 2 हजार 223 जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यामध्ये 325 नवे रुग्ण आढळून आले तर 1 हजार 906 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 50, आष्टी तालुक्यातील 34, बीड तालुक्यातील 98, धारुर तालुक्यातील 4, गेवराई तालुक्यातील 21, केज तालुक्यातील 21, माजलगाव तालुक्यातील 20, परळी तालुक्यातील 41, पाटोदा तालुक्याातील 24, शिरुर तालुक्यातील 8 तर वडवणी तालुक्यातील 5 जणांचा समावेश आहे.
दरम्यान,बुधवारी 9 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यामध्ये गेवराईच्या पोलिस वसाहतीमधील 60 वर्षीय पुरुष, सोनीजवळा (ता.केज) येथील 42 वर्षीय पुरुष, मोगरा (ता.माजलगाव) येथील 60 वर्षीय महिला, सेलूअंबा (ता.अंबाजोगाई) येथील 44 वर्षीय पुरुष, दैठणा (ता.परळी) येथील 60 वर्षीय पुरुष, जन्मेवाडी (ता.पाटोदा) येथील 65 वर्षीय महिला, राजूरी (ता.बी)) येथील 80 वर्षीय महिला, बीड शहरातील पालवण चौक परिसरातील 85 वर्षीय पुरुष, बनसारोळा (ता.केज) येथील 40 वर्षीय पुरुष यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 504 इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 23 हजार 129 इतकी आहे 635 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली
Leave a comment