सरपंचाने अधिकार दाखवताच महावितरण ताळ्यावर

चौसाळा । वार्ताहर

विद्युत महामंडळाकडून थकीत वीज बिल धारकांचे कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेमध्ये चौसाळा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यामुळे येथील सरपंच रेश्मा मधुकर तोडकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे अधिकार दाखवत महावितरण कार्यालयास महावितरण कार्यालयाकडे 1972 पासून थकलेला स्थानिक कर भरण्याचे पत्र दिले आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा थकीत कर न भरल्यास 30 मार्च मंगळवार रोजी महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. दि. 30 मार्च रोजी बीड येथील महावितरणच्या कार्यालयात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य गौतम नाईकवाडे यांच्यात बैठक झाली.त्यामध्ये ग्रामपंचायतने महावितरणला 50 हजारांचा चेक दिला असून सध्या तात्पुरता तोडगा निघाला असून आणखी तीन-चार दिवसांत अंतिम तोडगा काढण्यासाठी एक बैठक घेण्यात येईल असे महावितरणच्या अधिकार्‍यांनी ग्रामविकास अधिकारी चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य गौतम नाईकवाडे यांना आश्वासन दिले.

 

सरपंच रेश्मा मधुकर तोडकर यांनी शिवसेनेचे लोकसभा संघटक धर्मवीर विलास महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शना नुसार इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज कोविड नाईंटी चे सर्व नियम पाळून व जास्त जमा न जमवता दिनांक 30 मार्च 2019 रोज मंगळवार रोजी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रेश्मा ताई मधुकर तोडकर यांचे पती मधुकर तोडकर, उपसरपंच मोहम्मद बागवान, ग्रामपंचायत सदस्य अतुल शिंदे, दादाराव कळसे, पोपट कळसकर, शैलेश सोनवणे, कैलास चौधरी यांनी विद्युत मंडळाच्या ऑफिस जाऊन चौसाळा येथील अभियंते गहलोत यांच्याशी चर्चा करून वरिष्ठ अधिकार्‍यांची कॉन्फरन्स वर घेऊन संवाद साधला यावेळी वरिष्ठ अधिकारी सानप, गाडे साहेब,व चौसाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब चव्हाण ग्रामपंचायत सदस्य गौतम नाईकवाडे, हे देखील बीड येथील ऑफिसमध्ये उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रित चर्चा करून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत कडील विद्युत बिल वजा करून राहिलेले ग्रामपंचायतची थकबाकी दोन दिवसात देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे ऑफिस बंद करण्याचे आंदोलन मागे घेऊन आता चौसाळकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल असे मत सरपंच पती मधुकर तोडकर यांनी यावेळी व्यक्त केले.
 

 
 
 
 
 
 
 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.