ग्रामपंचायतीकडून महावितरणचे उपकेंद्र बंद करण्याचा इशारा
चौसाळा । वार्ताहर
चौसाळा ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचा कनेक्शनची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा तोडला आहे. दरम्यान कोरोना महामारीचे संकट आले आहे ते रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी यांनी लॉकडाऊनचे आदेश दिलेले आहेत. सर्व नागरिक घरात बसून आहेत. अशावेळी चौसाळा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडल्यामुळे चौसाळ्याचा पाणीपुरवठा ठप्प आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडून तातडीने महावितरणकडे 50 हजारांची थकबाकी भरु अशी तयारी दर्शवलेली असतानाही महावितरण अधिकार्यांकडून कसलीही दखल न घेता अजून जास्त पैसे भरा असे सांगितले जात आहे. या विरोधात आता ग्रामपंचायतीनेही कुरघोडी करत महावितरणचेही 16 लाखाचे बील ग्रा.पं.कडे थकीत असल्याचे सांगत 30 मार्चपर्यंत वीज पुरवठा सुरु न केल्यास महावितरणचे चौसाळा उपकेंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चौसाळा येथे 1972 रोजी विद्युत मंडळाचे उपकेंद्र व कार्यालय सुरू झाले असून तेव्हापासून या कार्यालयाने स्थानिक कर पट्टी कुठलाही भरलेला नाही तो कर आज पर्यंत जवळपास बावीस लाख असल्याचे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे या पैशासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयाकडून लाईट ऑफिसला मागणी केली जात आहे परंतु वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीही करू शकत नाहीत असे स्थानिक अधिकारी उत्तर देतात तरी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयने याअगोदरही वेळोवेळी वीजबिलासाठी अनेक वेळा पैसे भरले आहे तर लाईट ऑफिसचे ग्रामपंचायत कडे 16 लाख बिल असल्याचे सांगितले जात आहे या मध्ये ग्रामपंचायत म्हणणे आहे की आमचे बिल भरा आम्ही तुमचे बिल भरतो पण या दोन्ही मध्ये चौसाळकर नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकण्याची वेळ येऊ नये म्हणून चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयाकडून वीज जोडणी बाबत कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, नेकनूर पोलीस स्टेशन, यांना वरील सर्व बाबीची माहितीचे निवेदन देऊन लाईट जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. पण एवढ्यावर भी लाईट न जोडल्यास चौसाळा येथील लाईट ऑफिस चे कार्यालय 30 मार्च रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मिळून ऑफिस बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Leave a comment