केज । वार्ताहर
लॉक डाऊन मुळे केज शहर आणि परिसरातील सर्व दुकाने व बाजारपेठा बंद असून रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. तसेच चौक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
दि. २६ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात पूर्णतः लॉक डोउन असल्याची अधिसुचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांननी काढली आहे. त्या नुसार आज केजमधील सर्व बाजारपेठा, दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. तसेच चौका चौकात पोलीस बंदोबस्त असून त्यांना मदत करण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान, नगर पंचायतचे कर्मचारी, पंचायत समिती व महसुलचे कर्मचारी सोबत आहेत. तसेच तालुक्यात लॉक डाऊनची अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, केज पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रदीप त्रिभुवन, संतोष मिसळे, दादासाहेब सिद्धे, श्रीराम काळे, युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे दहिफळे, विजय आटोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले, त्यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.
=} शहरातील व तालुक्यातील सर्व औषध विक्रीचे दुकाने व दवाखाने यांना सूट आहे.
=} परीक्षार्थींना त्यांचे ओळखपत्रे दाखवून त्यांना प्रवाससाला मुभा देण्यात आली आहे.
=} कर्तव्यावरील कामगार यांना कर्तव्यावर जाण्या- येण्याची सवलत आहे.
=} बिनकामी रस्त्यावर फिरणारे, दुचाकीस्वार व वाहनधारक यांना प्रतिबंध घालायला हवा.
Leave a comment