आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटरमध्ये नेत्र तपासणीला उत्स्फुर्त प्रतिसाद
गरजू नेत्र रुग्णांनी आगामी आठवडाभरात तपासणी करण्याचे आवाहन
बीड । वार्ताहर
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त बीड शहरातील जालना रोडवरील आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटरमध्ये 15 ते 27 मार्च 2021 या कालावधीत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी तसेच अल्पदरात चष्मे व मोतिबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. या तपासणीच्या पहिल्या सहा दिवसात 600 पेक्षा अधिक रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच 50 रुग्णांवर अल्पदरात अहमदनगर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी दिली. दरम्यान गरजू नेत्र रुग्णांनी आगामी 27 मार्चपर्यंत नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त बीड येथे 12 दिवस मोफत नेत्र तपासणी तसेच अल्पदरात चष्मे व मोतिबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्चपासून तपासणीला सुरुवात झालेली आहे. येत्या 27 मार्चपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे. पहिल्या सहा दिवसात 600 पेक्षा अधिक रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.तसेच 50 रुग्णांवर अल्पदरात अहमदनगर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दरम्यान यांनी आजपर्यंत नेत्र तपासणी केलेली नाही अशा सर्व नागरिकांनी या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
याठिकाणी गरजू व्यक्तींसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान प्रवास,जेवण, औषधे व दोन दिवस राहण्याची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स तसेच स्वतःचा फोन नंबर सोबत आणावा. याशिवाय सध्या चालू असलेली औषधे, गोळ्या व सर्व डॉक्टरांचे रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. बीड शहरातील आनंदऋषी नेत्रालय व्हिजन सेंटर, शाहू बँकेच्या बाजूला, जालना रोड येथे ही नेत्रतपासणी केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी संजय गिते मोबाईल 7558282726 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गौतम खटोड यांनी केले आहे.
Leave a comment