नेकनूर । वार्ताहर
येथील स्त्री आणि कुटीर रुग्णालयात अनेक वर्ष वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ.गीते जिल्हा शल्य चिकित्सक बनल्यानंतर येथे सुधारणा करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी मात्र जाताना येथील अधिकारी आणि कर्मचारी बीड घेऊन जात नेकनूर चे रुग्णालय आजारी पाडले . भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ञ प्रतिनियुक्तीवर बीडला असल्याने नाव मोठे असलेल्या स्त्री रुग्णालयात डिलिव्हरी चे प्रमाण घटले तर रेफरचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली डॉक्टर ,कर्मचार्यांसोबत विशेष म्हणजे दोन कारकून पळवले गेलेत.
ग्रामीण भागातील महिलांची सोय व्हावी म्हणून तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ.विमल मुंदडा यांनी नेकनूर ला जिल्ह्यातील पहिले स्त्री रुग्णालय दिले .डॉ सुधीर राऊत यांच्या कार्यकाळात या रुग्णालयाने मोठी भरारी घेतली कॉर्पोरेट रुग्णालयाला लाजवेल असे हे रुग्णालय बनले होते. अलीकडे मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने अस्वच्छते बरोबरच सुविधांची वानवा दिसून येत आहे. कित्येक वर्ष या रुग्णालयाचे अधीक्षक असलेले डॉ.सूर्यकांत गीते काही महिन्यापूर्वी येथूनच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीड ला गेले यामुळे या रुग्णालयातील असुविधा दूर होतील अशी अपेक्षा असतानाच सगळे उलटे घडले . सध्या स्त्री रुग्णालयात एकही बालरोग तज्ञ नाही येथे कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉ. मुंडे कोविड सेंटरला तर डॉ. आंधळकर, भुल तज्ञ डॉ. पाटील प्रतिनियुक्तीवर बीडला यामुळे डिलिव्हरीची रिस्क घेतली जात नाही थेट बीड चा मार्ग रुग्णांना दाखवला जातो यामुळे महिला रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे त्याचबरोबर इतर रुग्णांनाही बीड चा मार्ग दाखवला जात आहे यामुळे दिवसेंदिवस रुग्ण आणि नातेवाईकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे .
Leave a comment