बीड । वार्ताहर
बीड जिल्हयातील बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई, माजलगाव, केज आणि आष्टी या शहरातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढत्या वाहनांमुळे वाहन पार्कीगंची समस्या उद्भवत असून शहरामधील महत्वाचे मार्ग,बाजारपेठा यामध्ये दुचाकी व चार चाकी वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्कीगमुळे वाहतूक कोंडी व अपघातामूळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याने जिल्हयातील चार चाकी व दुचाकी वाहनांच्या पार्कीगची दिशा ठरवून देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.
वाहनाच्या अस्तव्यवस्त पार्किगमुळे वाहतुक कोंडी व अपघात होत असल्यानेनागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत असल्यामूळे यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने बीड जिल्हयातील बीड, अंबाजोगाई, परळी,गेवराई, माजलगाव, केज आणि आष्टी या शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारीयांनी त्यांच्या पोलीसस्टेशन हद्दीतील व्यापारी, नगरपरिदचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या सोबत बैठक आयोजित करुन सर्वानमते शहरातील महत्वाचे मार्ग,बाजारपेठा यांमध्ये वाहनांची पी 1 पी 2 (सम व विषम) पार्किग व्यवस्था करण्याचे ठिकाण निश्चित करुन तसे प्रस्ताव प्राप्त करुन घेण्यात आले. सदर शहरामध्ये समविशम तारखेस पी 1 पी2 पार्किग व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. महाराष्ट पोलीस कायदा 1951 (1951 चा अधिनियम क्र.22) चे कलम 33 (1)(ब) सह मोटार वाहन कायदा 1988 (1988 चा अधिनियम क्र.59) चे कलम 115 व इतर प्राप्त अधिकारान्वये बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई, माजलगाव,केज आणि आष्टी या शहरामध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी रविंद्र जगताप यांनी सम विषम पार्किग व्यवस्था लागू केली आहे.
Leave a comment