आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटरमध्ये
बारा दिवस मोफत नेत्र तपासणी
बीड । वार्ताहर
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त बीड शहरातील जालना रोडवरील आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटरमध्ये येत्या 15 ते 27 मार्च 2021 या कालावधीत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी तसेच अल्पदरात चष्मे व मोतिबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे.गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त बीड येथे 12 दिवस मोफत नेत्र तपासणी तसेच अल्पदरात चष्मे व मोतिबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 15 मार्च ते 27 मार्च या कालावधीत ही तपासणी केली जाणार आहे. सर्व गरजू व्यक्तींसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान प्रवास,जेवण, औषधे व दोन दिवस राहण्याची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स तसेच स्वतःचा फोन नंबर सोबत आणावा. याशिवाय सध्या चालू असलेली औषधे, गोळ्या व सर्व डॉक्टरांचे रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. बीड शहरातील आनंदऋषी नेत्रालय व्हिजन सेंटर, शाहू बँकेच्या बाजूला, जालना रोड येथे ही नेत्रतपासणी केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी संजय गिते मोबाईल 7558282726 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गौतम खटोड यांनी केले आहे.
Leave a comment