जलवाहिनी फुटण्याचे प्रकार चालुच

शहरातील गळतीवर होतो 80 लाखाचा खर्च

तरीही बीडकरांना मिळेय अशुद्ध पाणी

बीड । वार्ताहर

माजलगाव प्रकाल्प आणि बिंदुसरा प्रकल्पामध्ये पाणीसाठा मुबलक असूनही बीडकरांना पाण्यासाठी तिष्टत बसावे लागत आहे. उन्हाचे प्रमाण वाढल्याने पाण्याचा वापर वाढला आहे तशी मागणीही वाढली आहे. आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते ते काही भागात चार-चार तास तर काही भागात अर्ध्या तासातच पाणी पुरवठा बंद केला जातो. काही ठिकाणी वाल सुरु केल्यानंतर पाणीच येत नाही तर काही ठिकाणी गळती, अर्थात लिकेज मोठ्या प्रमाणात झाल्याने गाळयुक्त पाणी येते. त्यामुळे बर्‍याच भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे लिकेज काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पाणी पुरवठा विभागामार्फत 80 लाख रुपयांचा खर्च केला आहे. एवढे पैसे खर्चुनही पाणी गळती थांबत नसेल तर काम केले काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीडकरांना विद्यमान परिस्थितीमध्ये  8 ते 10 दिवसाला पाणीपुरवठा होत आहे.  सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आणि काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने नगरपालिका प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जातो. काही भागातील महिला मध्यंतरी मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांनाही भेटल्या. त्यांनीही वेळ मारुन नेली. पाणी पुरवठा वेळेवर केला जाईल असे सांगितले. मात्र शहरातील पंचशीलनगर व इतर भागामध्ये आजही पाण्याची बोंब आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी लिकेज आणि खंडीत वीज पुरवठ्याचे कारण दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनी लिकेजवर पालिका जवळपास 80 लाख रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे समोर आले आहे. एवढा मोठा खर्च होवुनही लिकेज न मिळाल्याने पाहिजे तेवढ्या प्रेशरने नळाला पाणी येत नाही. आणि त्यामुळे नागरिकांनाही पाणी मिळत नाही.

शहराची लोकसंख्या तीने ते साडेतीन लाखाच्या जवळ गेली आहे. शहरालगतच्या भागातही मोठ्या प्रमाणात नागरि वस्तीची निर्मिती झाली आहे. ग्रामीण भागातील स्थलांतर बीडमध्ये मोठ्या संख्येने वाढले आहे. शहरालगतच्या वाड्या आणि लहान-लहान गावातून हे स्थलांतर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. नगरपालिकेमध्ये पाणीपुरवठ्यासाठी केवळ 125 कर्मचारी आहेत. अपुर्‍या मनुष्यबळावर आणि जलविाहनी जुनी झाल्याने वारंवार लिकेज होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहे. शहरातील काही भागात वर्षानुवर्ष वाल लिकेज आहेत. काही भागातील रस्त्यावर कायम पाणी साचलेले असते मात्र याकडे नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करतो. बार्शी रोडवरुन केएसके महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील व्हॉल्व्हमधून मागील अनेक वर्षांपासून पाणी गळती चालु आहे. तसेच अंबिका चौकामध्ये पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीवर असलेल्या व्हॉल्हमधून पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचलेले असते सातत्याने पाणी राहिल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मात्र याकडे  पालिकेकडून कायम दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे. एकंदरीतच उन्हाळ्याच्या तोंडावर आता नगर पालिका प्रशासनाने स्वच्छ पाणी पुरवठा करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

अमृत अटल योजना कधी सुरु होणार

शहरामध्ये दीडशे कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करुन शहरवासीयांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी अमृत अटल योजनेचे काम करण्यात आले आहे. हे काम पुर्णत्वाकडे गेले आहे. मात्र ही योजना कधी सुरु होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.