चार माजी संचालकांची तक्रार

बीड । वार्ताहर

जिल्हा बँकेतील आजी आणि माजी संचालकांची आणि पदाधिकार्‍यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी झाले असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांनी गेल्या काही दिवसापूर्वी प्रकाशीत केले होते. खोट्या माहितीच्या आधारावर सदरील वृत्त वर्तमानपत्रांनी प्रकाशीत केल्याचा प्रकार स्पष्ट झाला असून या प्रकरणी चार माजी संचालकांनी वृत्तपत्रांवर बदनामीचे खटले आणि फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती आहे. यामुळे ज्या वृत्तपत्रांनी इडीच्या चौकशीची बातमी छापली त्या वृत्तपत्रांच्या संपादकांवर फौजदारी खटले दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील  बहुतेक वर्तमानपत्रामध्ये 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान सदरील वृत्त प्रकाशीत झालेले होते. विशेष म्हणजे याच काळात जिल्हा बँकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून बीड जिल्हा बँक या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे अनेक संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर अनेक माजी संचालकांची आणि पदाधिकार्‍यांची न्यायालयीन प्रकरणे सुरु आहेत. जवळपास 15 ते 16 प्रकरणात आर्थिक आणि अनियमितता झाल्याने 30 पेक्षा जास्त संचालकांवर गुन्हे दाखल होवून प्रकरणे न्यायालयात गेली आहे. या दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालकांची ईडी मार्फत चौकशी होणार अशी माहिती भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अ‍ॅड.अजित देशमुख यांनी सोशल मिडियावरुन वर्तमानपत्रांना दिली.वर्तमापत्राच्या संपादकांनी आणि प्रतिनिधींनी या वृत्ताची खात्री न करता  ऐकीव माहितीवर बातम्या छापल्या या मध्ये बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांना नागपूरच्या ऐजी कार्यालयाच्या अथात लेखा परिक्षण विभागाने काही माहिती विचारली होती. ती माहिती या विभागाने ईडीकडे दिल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ राजाभाऊ मुंडे यांची ईडीकडून चौकशी झाली असा होत नाही मात्र काही मंडळींनी आपल्या विश्वासार्हतेचे भांडवल करत पुर्ण संचालकांची ईडी चौकशी करणार अशा निराधार बातम्या वर्तमानपत्रांना दिल्या आणि वर्तमानपत्रामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या. ज्यावेळी वर्तमानपत्रामध्ये या संदर्भात वृत्त प्रकाशीत झाले त्यावेळी ईडीमार्फत चौकशीच झाली नाही तर कारवाई काय होणार असा खोचक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जेष्ट माजी संचालकाने काही पत्रकारांना केला होता. आता 4 माजी संचालकांनी आपली आणि जिल्हा बँकेची बदनामी झाल्यामुळे आणि खोटे वृत्त छापुन जिल्ह्यातील शेतकर्‍यांची, खातेदारांची आणि जनतेची दिशाभुल केल्यामुळे अशा वर्तमानपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील संपादक अण्णा हजारेंना भेटणार

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निमुर्र्लन समितीचे अ‍ॅड.अजित देशमुख यांनी सदरील ईडी चौकशीची बातमी वर्तमानपत्रांना पुरवलेली आहे. त्यांच्याकडे इडीच्या नोटीसची माागणी काही संपादकांनी केली मात्र त्यांनी ती दिली नाही एका विशिष्ट संघटनेचे नाव घेवून जिल्ह्यातील काही ठरावीक क्षेत्रातील बातम्या सोशल मिडीयावर टाकुन त्या-त्या क्षेत्रातील लोकांबद्दल आणि शासकीय कार्यालयाबद्दल दिशाभुल करण्याचा प्रयत्न वर्तमानपत्राच्या माध्यमातून केला जात आहे. या संदर्भात जिल्ह्यातील काही संपादक जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची राळेगणमध्ये जावून भेट घेणार आहेत. अशा समितीचे पद अस्तित्वात आहे का? याची माहिती घेवून माहितीच्या अधिकाराचा वापर समाजाच्या भल्यासाठी करण्याच्या सुचना आपण आपल्या सर्व पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना देण्याची विनंती करणार आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.