रुग्णसंख्या वाढू लागली 

 

राज्यात लॉकडाऊनचा दोन दिवसात निर्णय

मुंबई । वार्ताहर 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये जाऊन कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेनंही कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा  संसर्ग वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकर  यांनी स्पष्ट केले आहे.

 


कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरवले आहे, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. लस नोंदणीसाठी मध्ये गोंधळ निर्माण झाला होता पण आता अडचण दूर करण्यात आली आहे, लस सर्वांनी घ्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. ’कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे, एक दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत, त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे’,  असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आह. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली आहे.

 

 

कोरोनाची स्थिती हाताबाहेर चालली..!

 

बीड जिल्ह्यात आज तब्बल अ‍ॅन्टीजेनसह 191 बाधित

बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर  चालली आहे. चार महिन्यानंतर आज गुरुवारी (दि.11) जिल्ह्यात तब्बल 185 कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे. बर्याच कालावधीनंतर बाधितांचा आकडा वेगाने वाढल्याने जिल्हाभरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी आतातरी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे झाले आहे.
बीड शहरातील व्यापार्यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. बुधवारी 495 जणांच्या अ‍ॅन्टीजेनमध्ये 9 व्यापार्यांचे रिपोर्ट कोरोनाबाधित निष्पन्न झाले होते. त्यानंतर आज तपासणीच्या दुसर्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.11) दुपारी 2 वाजेपर्यंत 403 व्यापार्यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी ही माहिती दिली.  
जिल्ह्यात गुरुवारी 1407 संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या यात 1222 जणांची अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर 185 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये सर्वाधिक 85 रुग्ण बीड तालुक्यात निष्पन्न झाले आहेत. या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 42, आष्टी 16, माजलगाव 13, गेवराई 12, केज 7, परळी 5, वडवणी 3 तसेच शिरुर व धारुर तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी ही माहिती दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.