आ.लक्ष्मण पवार यांना मंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही
गेवराई । वार्ताहर
विधानसभा मतदार संघाचे आ. लक्ष्मण पवार यांनी वाळू प्रश्नी उपस्थित केलेली मागणी बरोबर आहे. त्यांनी केलेल्या सर्व मागणीची दखल घेतली जाईल असा विश्वास महसुलमंञी बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (दि.5) विधानभवनात झालेल्या बैठकीत व्यक्त केल.
आ.लक्ष्मण पवार व आ.राजेश पवार यांनी केलेल्या मागणी नुसार वाळु टेंडर मधील अपसेट किमंत 25 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत, आणखी अपसेट प्राईज कमी करण्यासाठी लवकरच वित्त विभागाशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेऊ, प्रायोगिक तत्वावर गेवराई व नायगाव मतदारसंघातील वाळू घाटावरून फक्त ट्रॅक्टरच्या सह्यानेच वाळूची वाहतूक व्हावी यासाठी निर्णय घेण्यात येईल तसेच गोरगरिबांना त्यांच्या घरकुलासाठी कमीत कमी दरात वाळू उपलब्द कशी होईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील.लक्ष्मण पवार व राजेश पवार यांनी केलेल्या मागण्या फक्त गेवराई किंवा नायगाव मतदारसंघापुरता नसुन तो महाराष्ट्रातील सर्व वाळु घाटावर लागु करण्याचा चागंला विषय आ.लक्ष्मण पवार व राजेश पवार यांनी सरकारच्या समोर आणला त्यांनी मागणी केलेले सर्व विषय गाभीर्याने घेण्यात येतील असे आश्वासन महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांनी आज झालेल्या बैठकी दरम्यान बोलताना दिले आहे यावेळी आ,.लक्ष्मण पवार व आ.राजेश पवार यांची उपस्थिती होती
विधानसभा मतदार संघातील अवैध वाळु तस्करीमुळे गेवराई तालुक्यातील रस्त्यांची दैयनीय अवस्था होती पण गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ.लक्ष्मण पवार यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदाकाठ व सिदफना नदी पाञावरील वाळु घाटाचे टेंडर काढुन टेंडर मध्ये अपसेट किमंत कमी करा तसेच वाळु वहातूक करण्यासाठी हायवा पेक्षा फक्त ट्रॅक्टरचाच वापर झाला पाहिजे तरच रस्ते खराब होणार नाहीत वाळु तस्करीमुळे खराब झालेल्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.
Leave a comment