माजलगाव । उमेश जेथलिया

माजलगाव शहर वाढीचा वेग सावरगाव रोडला जास्त म्हणून सावरगावपर्यंत आणि नप चा हद्द वाडीचा प्रस्ताव सिंधफणा पलीकडे म्हणून पात्रुड-पवारवाडी पर्यंत भूमाफियाचा नंगानाच सुरू असून 1 लाख रु गुंठ्याच्या जमिनीला 5-25 लाख रु.च्या भावाने घेऊन काटकसर केलेला पैसा शेतकरी,शिक्षक,कर्मचारी एका झटक्यात भूमाफियाच्या घशात घालत आहेत.
 शहराबाहेर पवारवाडी रोड वर 10 किमी पर्यंत,पात्रुड रोडवर 10 किमी पर्यत,सावरगाव रोड वर 10 किमी पर्यंत  शेतकर्‍याच्या जमिनी कवडीमोल भावात नुसतं टोकन देऊन भूमाफिया मार्फत विकत घेतली जात आहे.30 ते 40 लाख रु एक्करने विकत घेतलेली जमिनीचे 25 ते 30 प्लॉट पाडले जात आहेत.रोड लगतचे प्लॉट 1500 ते 2000 रु स्क्वेअर फूट प्रमाणे 25 ते 40 लाख रुपयात विकून 2 प्लॉटमध्ये जमिनीची किंमत वसूल केली जात आहे.हे सर्व व्यवहार जमीन मालकाच्या नावावर होत आहेत.मात्र सगळे प्लॉट विकल्याशिवाय जमीन मालकाला पैसे दिले जात नाही.असा नंगानाच माजलगाव शहरात भूमाफियांनी मांडला आहे. सदरील प्लॉटिंग पाडताना एमएसइबी, बीएन्डसी,न.प.ची एनओसी न घेता केवळ गुंठेवारी करून प्लॉट विक्री केली जात आहे.शहराबाहेर 100 ठिकाणी प्लॉटची विक्री सुरू असून यातील 90 टक्के प्लॉटिंगचे एनए लेआउटच नाही हे विशेष.या कामी नगरपरिषद, तलाठी,ग्रामसेवक मंडळ अधिकार्‍यां सह महसूल मधील सर्वांचे हात ओले असून अधिकार्‍यांच्या आशीर्वादनेच प्लॉटिंगचे व्यवहार होत आहेत.

प्लॉटिंगचा फुगा फुटणार

भविष्यात रग्गड पैसा देणारी गुंतवणूक म्हणून शिक्षक,कर्मचारी वर्ग आपला पैसा प्लॉट विकत घेऊन त्यात गुंतवणूक करत आहेत तर ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना राहण्यासाठी शहरात आपले घर हवे म्हणून आज प्लॉट विकत घेत आहेत.पण प्लॉटिंग चा हा फुगा फुटणार असून पुढील 10 वर्षात मुद्दल ही हातात येणार नाही अशी अवस्था पाहण्यास मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

तालखेडचे सावरगावला प्लॉट घेऊ लागला

माजलगाव शहराची प्लॉटिंग फुले पिंपळगाव बाजार समिती आवाराच्या पुढे सावरगाव पर्यंत गेली आहे.सावरगाव हुन तालखेड फक्त 10 किमी अंतर आहे लालखेड चा रहिवाशी सावरगाव जवळ किंवा माजलगाव धरण परिसरात प्लॉट घेऊन शहरात प्लॉट घेतल्याचे आत्मिक समाधान मिळवत असला तरी स्वतः सह कुटूंबाची एक प्रकारे फसवणूक करत आहे.

लालसेपोटी काळ्याआईवर अत्याचार

पैशाच्या लालसे पोटी आपली जमीन सुपीक आणि कृषक असूनही ती अकृषक असल्याचे दाखवण्यासाठी प्रशासनाला 2 पैसे चारून खोटे एनए लेआउट काढले जात आहेत.सुपीक आशा काळ्या आईवर एक प्रकारचा अत्याचारच या माध्यमातून केला जात आहे.सिंधफणा काठी 50 ते 100 फुटापर्यंत काळी माती असून तिथे खडक लागत नाही अशा ठिकाणी प्लॉटिंग पाडण्यास प्रशासन परवानगी देत आहे.

40 लाखाच्या जमिनीचे 4 ते 8 कोटी

 शेतकर्‍यांकडून 40 लाख रु.एक्करने जमीन घेऊन त्याची प्लॉटिंग पाडून भूमाफिया 4 ते 8 कोटी रु ची माया जमवत आहेत.हे सर्व 8 कोटी चे व्यवहार जमीन मालकाच्या नावावर होतात त्याच्या हातात केवळ 40 लाख टेकवले जातात मधला भूमाफिया यात गबबर होत असून भविष्यात जमीन मालकाच्या घरी 8 कोटी च्या व्यवहारमुळे आयकर विभागाच्या धाडी पडू शकतात.शिक्षक कर्मचारी आपला पांढरा पैसा येथे लावून काळ्या पैशाच्या निर्मितीला हातभार लावत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.