प्रधान सचिव वनविभाग यांना तक्रार:-डॉ.गणेश ढवळे 

पाटोदा । वार्ताहर

तालुक्यातील नायगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत चुबळी व मळेकर वाडी डोंगरपट्ट्यात आग लागली असून वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी आलेले अधिकारी यांच्या चौकशीनंतर कारवाईच्या भितीपोटी वनविभागातील आगीच्या घटना बीड जिल्ह्यात वारंवार घडत असल्याची तक्रार प्रधान सचिव वनविभाग  मंत्रालय यांनी दिल्यानंतर मंत्रालयातुन मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक व वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तर वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद यांनी विभागीय आधिकारी सामाजिक वनीकरण बीड यांना 3 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असून आग लागण्याच्या घटना संशयास्पद असून त्याची वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र कमिटी मार्फत चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रधान सचिव महसुल व वनविभाग यांना केली आहे. 

वनविभागातील विविध गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी पुराव्यासह तक्रार, निवेदन, आंदोलने केल्यानंतर औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी चौकशी आदेश दिल्यानंतर कागदोपत्रीच वनविभागातील कामे केल्याचे दाखवून निधीचा अपहार वनविभागातील आधिकारी-कर्मचारी यांनी संगनमताने केला असून याप्रकरणात संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील वनविभागात वारंवार आग लागण्याच्या घटना निव्वळ योगायोग नसून जाणीवपूर्वक आग लावल्याचा घातपाताचा प्रकार असून वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात कागदोपत्रीच कामे दाखवुन 10 कोटी 84 लाख रूपये गैरव्यवहार प्रकरणात दि.7 डिसेंबर 2021 रोजी वरील प्रकरणात मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक महाराष्ट्र राज्य औरंगाबाद व वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश रमेश हि.पवार, कार्यासिन आधिकारी महसुल व वनविभाग मंत्रालय यांनी दिलेले आहेत. 

 दि.8 फेब्रुवारी रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस च-हाटकर,वंचित बहुजन आघाडी बीड तालुकाध्यक्ष,  शंकर भोसले उदयनराजे प्रतिष्ठान युवक सेना बीड जिल्हाध्यक्ष, जुबेरखान महंमद बीडकर, सामाजिक कार्यकर्ते, विलास गवळी धारूरकर, अशोक कातखडे शिरूर कासारकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर दि.16/02/2021 रोजी विभागीय वन आधिकारी, सामाजिक वनीकरण बीड यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद कार्यालयामार्फत संबधित प्रकरणात मुद्देनिहाय चौकशी करून 3 दिवसात अहवाल तक्रारदार व कार्यालयास सादर करण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्याप महिना झाला तरी जाणीवपूर्वक चौकशीच करण्यात आली नाही ,त्यामुळेच अपहार करणा-या आधिका-यांवर कारवाई होऊ नये पुरावे हाती लागु नयेत यासाठीच वनविभागात आग लागण्याच्या घटना वारंवार घडविल्या जात असल्याचा संशय निर्माण होत आहे त्यामुळेच   संबधित प्रकरणात स्वतंत्र उच्च स्तरीय चौकशी नेमण्यात येऊन  दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत प्रधान सचिव वनविभाग मंत्रालय, वनसंरक्षक प्राधिकरण औरंगाबाद यांना केली आहे 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.