जिल्ह्यात ५३ नवे रुग्ण, २७ कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात रविवारी (२१) कोरोनाचे ५३ नवे रूग्ण आढळले तर २७ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
रविवारी दिवसभरात ४१९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली.यातील ३६६ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५३ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई १९, बीड १६, शिरूरकासार ६, परळी ५, केज ३ तसेच आष्टी, धारूर, गेवराई, पाटोदा तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. तसेच रविवारी २७ जण कोरोनामुक्त झाले.आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ४१६ एवढी झाली आहे. पैकी १७ हजार ५४५ जण कोरोनामुक्त झाले तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ८ हजार ४४९ सशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली, पैकी १ लाख ९० हजार ३३ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात आठ रुग्णालयात ११३८ बेड उपलब्ध
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ रुग्णालयांमध्ये ११३८ खाटांची क्षमता आहे. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालय 300 खाटा, अंबाजोगाई येथील एसआरटी रुग्णालय 300 खाटा, लोखंडी सावरगाव येथील वुमन्स हॉस्पिटलमध्ये 250 खाटा, माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये ५० खाटा, श्री माऊली हॉस्पिटल बीड ३० खाटा, बीडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १५० खाटांची क्षमता असून आष्टी ट्रामा केअरमध्ये ५० तर अंबाजोगाई येथील थोरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या ८ रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
Leave a comment