अंबाजोगाईच्या पोखरी शिवारातील घटना

अंबाजोगाई । वार्ताहर

अंबाजोगाई शहरालगत साधारण तीन किमी अंतरावर असलेल्या पोखरी शिवारात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती, काल सायंकाळी एका मोठ्या काळवटीचा फडशा पाडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हा बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचा अंदाज वर्तवला. मात्र परिसरातील सीसीटिव्ही फुटेज हाती आले तेव्हा कोल्हे अन् रानटी कुत्र्यांनी त्या काळविटाची शिकार केल्याचे स्पष्ट झाले. 
अंबाजोगाई शहरालगत अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या पोखरी शिवारात दोन दिवसापासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा शहरात होत होती. असे असतांनाच 7 फेब्रुवारीच्या रात्री पोखरी शिवारातील बेजगमवार व जाधव या दोघांच्या शेताच्या बांधालगत एका मोठ्या काळवटीचा फडशा पाडला असल्याचे आढळून आले. ही माहिती वार्‍यासारखी पसरताच या विभागातील शेतकर्‍यांनी एकत्र येवून घटनास्थळास भेट देवून पाहणी केली असता अर्धवट फस्त केलेले काळवीट दिसून आले.याची माहिती या विभागातील शेतकर्‍यांनी वन विभागाचे अधिकारी भगवान गीत्ते व कर्मचारी यांनी घटनास्थळी सकाळी 9 वाजता शेतकर्‍यांसह भेट  दिली. तिथे मृत काळवीटाच्या अंगावर सकाळपेक्षा अधिक मांस खाल्ल्याचे दिसून आल्यामुळे अधिक घबराट पसरली.

या घटनेची पाहणी केल्यानंतर वन अधिकारी भगवान गित्ते शेतकर्‍यांशी चर्चा करतांना या परिसरात आढळुन आलेल्या पायाच्या ठशाची पाहणी केली.  काळवीट फस्त केलेला प्राणी हा बिबट्या आहे की तडस आहे अशी शंका उपस्थित करीत बिबट्या हा प्राण्याची हत्या करतांना नरडीचा घोट घेवून हत्या करतो व तो प्राण्याचे मांस हाडासह खावून टाकतो असे सांगत हा प्राणी तडस असण्याचीच अधिक शक्यता वर्तवली होती. या घटना स्थळाजवळच अंगदराव कराड यांच्या शेतात शेततळे आहे.या शेततळ्यावर हा प्राणी पाणी पिण्यासाठी गेला आहे का याची पाहणी केली असता या शेततळ्याच्या परिसरातही या प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. या सर्व प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर काळवीटाची शिकार बिबट्याने नव्हे तर कोल्हे अन् रानटी कुत्र्यांनी केल्याचे स्पष्ट झाले.  वनविभागानेही याला दुजोरा दिला.त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.