नेकनूर । वार्ताहर
बालकाच्या खून प्रकरणातील आरोपी पती-पत्नीला बीड न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी बीड तालुक्यातील रत्नागिरी येथे ही घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
बीड तालुक्यातील नेकनूरपासून जवळच असलेल्या रत्नागिरी येथे सहा वर्षे बालकाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.3) रोजी घडली होती. याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत रोहिदास नवनाथ सपकाळ आणि त्यांची पत्नी देवई बाई रोहिदास सपकाळ यांना अटक केली. त्यांच्यावर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. शुक्रवारी (दि.5) बीड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी येथे शुभम सपकाळ या सहा वर्षे वयाच्या मुलाचा खूनाचा प्रकार झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. म्हैस मारली या संशयातून बदला म्हणून भावकीतील दाम्पत्याने त्याचा खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment