घाटनांदूर । वार्ताहर
परळी फावडेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते (दि.6) दुपारी बारा वाजता घाटनांदूर येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ.संजय दौड, जि प अध्यक्षा शिवकन्या सिरसाट हे राहणार आहेत.
याप्रसंगी अशोक डक, बजरंग सोनवणे, बन्सीधर सिरसाट, सरोजनी हालगे, राजकिशोर मोदी, सचिन मुळूक, वाल्मिक कराड, दत्ता पाटील, गोविंद फड, गोविंद देशमुख, आलिशान पटेल, बालाजी मुंडे, बाळासाहेब गंगणे, सुधाकर माले, जयश्री शेप, शंकर उबाळे, राजेश्वर चव्हाण, मीना भताने, मच्छिंद्र वालेकर, अजित देशमुख, रखमाजी सावंत, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांस परिसरातील ग्रामस्थानी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच मंदाकिनी जाधव उपसरपंच सचिन (बाळासाहेब) देशमुख यांनी केले आहे. अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत ह्या रस्त्याचे हायब्रीड एनिव्हिटी योजनेतंर्गत अठ्ठेऐशी कोटी रुपये खर्च करून सात मिटर रुंदीचा बावीस कि.मी लांबीचा हॉटमिक्स रस्ता करण्यात येणार आहे. यामुळे चांदापुर, अंबलटेक, तेलंगणा, घाटनांदूर, चोपणवाडी, पिंप्री, फावडेवाडी हे गावे लातूर व परळीशी जोडली जाणार आहेत.
Leave a comment