बीड । वार्ताहर
शहरातील एका खाजगी रूग्णालयात टिसू पेपर का देत नाहीस, असे म्हणत खाजगी डॉक्टरला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय डॉक्टरसह अन्य एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सोमवारी पहाटे 1.12 मिनीटांनी ही घटना घडली.
शहरातील शाहुनगर भागात डॉ.मनोज लांडगे यांचे यमुनाई डायग्नोस्टीक सेंटर आहे. रविवारी मध्यरात्री गेवराई येथील डॉ.बालाजी शेंडगे यांना कोरोन लस घेतल्यानंतर उजव्या हातात वेदना होत होत्या. त्यामुळे तालुका नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम यांनी डॉ.लांडगे यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयातील फिजिशियन डॉ.संतोष धुत व डॉ.शेंडगे हे दोघे सेंटरमध्ये आले. कलर डॉप्लर करून झाल्यावर टिसू पेपरवरून त्यांच्यात बाचाबाची झाली. यात या दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे डॉ.लांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डॉ.धुत व डॉ.शेंडगेविरोधात शिवाजीनगर ठाण्यात कलम 504, 506, 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
Leave a comment