काम सुरू होणार- नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर
बीड । वार्ताहर
बीड शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्यांची कामे आता जवळपास पूर्ण होत आली आहेत इमामपूर रस्त्याचे कामही पूर्ण होत असतानाच या भागातील काही लोकांनी राजकीय द्वेषापोटी हे काम अडवले होते याठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज पाईप लाईन व अतिक्रमणामुळे हा रस्ता केवळ 70 मीटरचा राहिला होता मातृत्व आता येत्या 28 जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.
बीड शहरातील 16 मुख्य रस्त्यांची कामे कायमस्वरूपी व्हावीत यासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला शहरातील जवळपास सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून शहरवासीयांना चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे इमामपूर रोडचे काम चालू असतानाच याठिकाणी आधी अंडर ग्राउंड ड्रेनेज व पाईपलाईनचे काम करण्यात आले हा रस्ता 800 मीटर चा असून यातील 730 मीटरचे काम पूर्ण झाले आहे मात्र केवळ 70 मीटर चे काम हे त्या ठिकाणच्या पाईप लाईन व अतिक्रमणामुळे राहिले होते नेमका हाच मुद्दा घेऊन काही राजकीय मंडळींनी राजकीय द्वेष ठेवून रस्त्याचे काम थांबले होते या भागात दलित वस्ती आणि गोर गरीब कामगार राहतात हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे तसेच या भागातील जमिनीलाही चांगला भाव मिळणार आहे हा उदात्त हेतू बाजूला ठेवून काही लोकांनी यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला मात्र आता हे काम येत्या 28 जानेवारी रोजी सुरू करून पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.काम करण्याची तयारी असतानाही काही नागरिकांनी हे काम अडवले होते मात्र आता ते पूर्ण होणार असल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी सांगितले
Leave a comment