धोंडराई । वार्ताहर
स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या एका होतकरू विद्यार्थ्याचा विजेच्या खांबाला हात लागल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील धोंडराई येथे सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास घडली.
राजेश शाहु खनके (19) रा.धोंडराई असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. राजेश हा गरिब कुटुंबातील एक होतकरु विद्यार्थी होता. तो शिक्षणासाठी आपल्या मामा समवेत अहमदनगर येथे राहत होता. तो सोमवारी धोंडराई येथे आला असता महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी ठरला आहे. अत्यंत हुशार ,स्वभावाने गरिब राजेशच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहीण असा परिवार आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment