पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंच्या याच भाषणाचा दाखला देत, जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. तसेच,
कुछ यादे और कुछ वादे.. असे म्हणत केंद्र सरकारला आठवणही करुन दिलीय
मुंबई | प्रतिनिधी
देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते. सरकारचेआर्थिक धोरण, विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन यांच्या दृष्टीने जनगणना महत्त्वपूर्ण ठरते. दरम्यान आपल्या देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याची याआधी माहिती दिली आहे. जनगणनेला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेचा ओबीसी जनगणनेच्या मागणीचा एक व्हिडीओ शेअर करत ओबीसींची जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या संंबंधी हिंदीमध्ये दोन ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ही मागणी केली आहे
पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. कुछ यादे और कुछ वादे."
पंकजा मुंडे यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "2021 ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही."
हे ट्वीट करताना पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2010 सालचा आहे. त्यावेळी संसदेत बोलताना भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमची एवढीच मागणी आहे की ओबीसींची आणि एसटी, एससी लोकसंख्येची जनगणना करावी. अन्यथा सरकारला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल."
https://youtu.be/UQAbPQ9Uwc0
विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे दोन्ही ट्वीट हिंदीतून केले आहेत. त्यामध्ये 'कुछ यादे और कुछ वादे' असे म्हणत त्यांनी केंद्रातील आपल्याच सरकारला ओबीसी जनगणनेची आठवण करुन दिल्याचं सांगण्यात येतंय. येणारी 2021 सालची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षापासून ओबीसी जनगणनेची मागणी विविध पक्षांकडून करण्यात येतीय.
आम्ही ओबीसीमध्ये कुणाला घुसू देणार नाही - विजय वडेट्टीवार
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा 'ओबीसींची स्वतंत्र जनगणना होऊन त्यांची एकवेळ संख्या काय आहे ते कळू द्या' अशी मागणी केली आहे.
आम्ही ओबीसीमध्ये कुणाला घुसू देणार नाही,आम्ही ओबीसींचे पहारेकरी असून जागते रहो आमचं काम आहे. पण काही विघ्न संतोषी लोकं ओबीसींमध्ये अडथळा आणत असून आम्ही एक आहोत यासाठी जालन्यात मोर्चा काढत असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
यंदाची 16 वी जनगणना डिजिटल होणार
जनगणना देशाच्या भविष्यातील विकासाच्या योजना बनवण्यासाठी आधार ठरत असते. त्यामुळे जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 1865 नंतर देशात आतापर्यंत 16 वी जनगणना होणार आहे. आतापर्यंत जनगणनेच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर होणार आहे. यामध्ये सर्व आकडेवारी डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे. जेवढ्या सुक्ष्म पद्धतीने जनगणना होईल. तेवढीच देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मदत मिळणार असल्याचं अमित शहा यांना म्हटलं होतं. 1 मे पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. सरकारने जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या काही संभाव्य प्रश्नांची अधिसुचनाही प्रसिद्ध केली आहे.
Leave a comment