शिरुरकासार । वार्ताहर
यावर्षी शिरुर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव, विहिरी, बोअर पाण्याने डबडबून गेले आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी गहू, हरभरा,ऊस, मका,ज्वारी आदि पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली असून पिके बहरात आली आहेत. परंतु वीजेच्या सततच्या लंपडावामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.
हाती आलेली पीके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील शेतकरी तीन वर्ष दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता; परंतु यावर्षी निसर्गाने साथ दिली असल्यामुळे पिके बहरात आली परंतु वीजेअभावी पाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस यांनी याकडे लक्ष देवून केवळ वीजेअभावी जळून चाललेल्या पीकांना जीवदान द्यावे व संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी समज द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करत आहे.
Leave a comment