मुंबई । वार्ताहर

आयुष मंत्रालयाअंतर्गत बी.ए.एम.एस, बी.यु.एम.एस.व बी.एच.एम.एस. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयुष मंत्रालयाने पर्सेंटाइलची मर्यादा  शिथिल केली असल्याची माहिती डॉ.अरुण भस्मे यांनी आमच्या प्रतिनिधिकडे दिली सक्षम अधिकार्‍याने त्यानुसार ओपन व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी 50 वरून 40 पर्यंत म्हणजेच 147 वरून 113 मागासवर्गियांसाठी व इतर मागासवर्गीयांसाठी 40 वरून 30 पर्यंत म्हणजेच 113 वरून 87 व अपंग कायदा 2016 अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 45 वरून 35 पर्यंत म्हणजेच 129 वरून 99 मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंबंधी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे  त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन क्रमांक 22 सक्षम अधिकारी महाराष्ट्र यांनी वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

महाविद्यालयाच्या परवानग्या उशिरा प्राप्त झाल्यामुळे व या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा कल पाहून पर्सेंटाइल कमी करण्याबाबत आयुष मंत्री ना. श्रीपाद नाईक व सेक्रेटरी वैद्य राजेश कोटेचा यांच्यासोबत 5 जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल डॉ. अरुण भस्मे यांनी ना. मंत्री श्रीपाद नाईक व सेक्रेटरी वैद्य राजेश कोटेचा यांचे आभार मानले. पर्सेंटाइलची मर्यादा कमी करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांना असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे यांचे नेतृत्वाखाली पृथ्वीराज पाटील डॉ. अरुण भस्मे, डॉ.जी.डी पोळ, डॉ. बाळासाहेब पवार यांनी भेटून केंद्राकडे शिफारस करण्यासाठी विनंती केली होती. राज्यशासनाने आयुष मंत्रालयाकडे पर्सेंटाइल कमी करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पर्सेंटाइल मर्यादा शिथिल  करण्यात आली. त्याबद्दल असोसिएशनने ना. अमित भैया देशमुख यांचेही आभार मानले. या निर्णयामुळे महाविद्यालयातील सर्व जागा भरतील अशी आशा निर्माण झाली आहे.फेडरेशनचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी  श्रीपाद नाईक मंत्री महोदय यांची वेळ घेतली होती

नॅशनल फेडरेशन ऑफ होमिओपॅथी कॉलेजेसच्या वतीने खासदार डॉ. भागवत कराड व डॉ. अरुण भस्मे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय आयुष मंत्री ना. श्रीपाद नाईक यांना भेटून विनंती केली होती. या शिष्टमंडळात डॉ.एस.पी.एस.बक्षी, डॉ. रामजी सिंग, डॉ. सुरेश नांदाल, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. पी वाय कुलकर्णी, डॉ. मनोज महाजन, डॉ. विलास हरपाळे, डॉ.रचना सिंग, डॉ. समीर पाचिगर, डॉ.पंकज शर्मा, डॉ. मनीष इनामदार, शिवराज कल्पना, डॉ.श्रावण कुमार, डॉ.जितेन्द्र कुमार यांनी बैठकीत सहभाग घेतला होता.तसेच कट ऑफ डेट 31 मार्चपर्यंत वाढ करण्याची विनंतीही यावेळी केली आहे. यावरही केंद्रीय पातळीवर विचार सुरू आहे असे डॉ. अरुण भस्मे यांनी सांगितले. ज्यांनी पुर्वी नोंदणी केली आहे त्यांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी नोंदणी केली पण प्रीफरन्स फॉर्म भरला नसेल त्यांनी वरील अभ्यासक्रमासाठी नोंदणी करावी व ज्यांनी पूर्वी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.