बीड | वार्ताहर
जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.15) 424 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गाव कारभारी निवडण्यासाठी झालेल्या या निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात
विक्रमी 83.58 टक्के मतदान झाले.
या निवडणुकीसाठी 61 हजार 788 स्त्री व 71 हजार 710 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. येत्या 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीसाठी 424 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडली. 842 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. या निवडणुकीसाठी 69 हजार 14 स्त्री व 79 हजार
533 पुरुष असे एकुण 1 लाख 48 हजार 547 मतदार संख्या होती. मतदान प्रक्रिया पार पडताना शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जवळपास 1500 पोलीसांचा बंदोबस्त सर्व मतदान केंद्र परिसरात तैनात करण्यात आला होता. किरकोळ
प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली धारूर तालुक्यातील एका गावात काही वेळ मतदान यंत्र बंद पडल्याने गोंधळ उडाला होता नंतर स्थिती नियंत्रणात आली. निवडणुकीला सामोरे गेलेल्या सर्व उमेदवारांचे लक्ष आता मतमोजणी कडे
लागले आहे.
Leave a comment