मतपेट्यांसह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

बीड । वार्ताहर

स्थानिक स्वराज्यचा महत्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी संपल्यानंतर आज जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात मतदान होत आहे. आज शुक्रवारी (दि.15) सकाळी

7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून निवडणूकीची पूर्ण तयारी करण्यात आली असून गुरुवारी दुपारीच नियुक्तीच्या ठिकाणी निवडणूक कर्मचारी तसेच आवश्यक तो

पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. मतदान यंत्रही केंद्रावर रवाना झाले. आज दिवसभरात जिल्ह्यातील ग्रा.पं.सदस्यपदासाठीच्या इच्छुकांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. येत्या 18 जानेवारीला मतमोजणी होणार

आहे. 


बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यात बीड तालुक्यातील 24 ग्रा.पं.साठी 162 उमेदवार निवडणूकीला सामोरे जात आहेत. तसेच गेवराई तालुक्यात 21 जागेसाठी 165 उमेदवार

रिंगणात आहेत. माजलगाव तालुक्यातील 4 ग्रा.पं.साठी 55 उमेदवार नशिब आजमावत आहेत. वडवणी तालुक्यात केवळ 2 ग्रा.पं.साठी मतदान होत असून या ठिकाणी 13 उमेदवार रिंगणात आहेत. धारुर तालुक्यातील 4 ग्रा.पं.साठी

35, केजमध्ये 19 ग्रा.पं.साठी 141, अंबाजोगाईतील 3 ग्रा.पं.साठी 17 तसेच परळी तालुक्यातील 6 ग्रा.पं.साठी 42 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. याशिवाय पाटोदा तालुक्यातील 9 ग्रा.पं.साठी 73, आष्टी तालुक्यातील 11

ग्रा.पं.साठी 75 व शिरुरकासार तालुक्यातील 8 ग्रा.पं.साठी 64 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व 882 उमेदवारांचे भवितव्य आता आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्व

मतदान केंद्र परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. तसेच महसुल झोनही तयार करण्यात आले आहेत.येत्या दरम्यान 18 जानेवारीला मतमोजणीचा दिनांक, ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने

तहसिलदार निश्चित करणार आहेत. दरम्यान 21 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे. 

अठरा ग्रामपंचायतीचे 134 सदस्य बिनविरोध 

जिल्ह्यातील 18 ग्रा.पं.निवडणूकीपूर्वी पुर्णत: बिनविरोध ठरल्या आहेत. यात बीड तालुक्यातील मौजे बह्मगाव, मौजवाडी, कातरवाडी, कोळवाडी, वंजारवाडी या 5 ग्रा.पं.चा समावेश आहे. शिवाय गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी,

माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी, धारुर तालुक्यातील कोथिंबिरवाडी, केज तालुक्यातील सिंधी, आंधळेवाडी, घाटेवाडी व मोठेगाव अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती,केंद्रेवाडी, हनुमंतवाडी, वाकडी,परळी तालुक्यातील वंजारवाडी व

आष्टी तालुक्यातील शेरी बु. या 18 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील 14 ग्रा.पं.ची सदस्यसंख्या 7 इतकी आहे तर उर्वरित 4 ग्रामपंचायती 9 सदस्यसंख्या असणार्‍या आहेत.म्हणजेच या ग्रा.पं.चे 134 सदस्य बिनविरोध ठरले

आहेत.


मतदानासाठी 424 केंद्र

बीड  जिल्ह्यातील 111 ग्रा.पं.साठी आज 424 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी पोलिस ठाणे स्तरावर बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यात 6 उपअधिक्षक, 10 निरिक्षक, 119 सहा.निरिक्षक, उपनिरिक्षक, 849 पोलिस

अंमलदार, 347 होमगार्ड, 2 जलद प्रतिसाद पथक(क्यु.आर.टी), 5 आर.सी.पी प्लाटून असा बंदोबस्त नेमण्यात आल्याची माहिती पोलिस दलाच्या वतीने देण्यात आली. 

सर्व छायाचित्र :- कृष्णा शिंदे, बीड

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.