शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट पवारांच्या भेटीला पोहोचलेत. सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील दाखल झाले असून, त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली आहे.
धनंजय मुंडेंवरच्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
पवारांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. विश्वास नांगरे पाटील सह्याद्री अतिथिगृहावर
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांनंतर या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झालंय.
पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असतानाचएनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील काल रात्री अटक केली आहे. तर, दुसऱ्याबाजूला भाजप आक्रमक झाली असून पोलिसांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेची तक्रार रीतसर निंदवून मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी समजून अत्याचाराचे आरोप झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. तर, निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्ये व त्यांचा खर्च लपवल्याने त्यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप गंभीर असून पक्ष विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करेल असे सांगितले आहे.
तर, भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्यासह मनसेच्या मनीष धुरी यांनी आपल्याला देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला पण वेळीच सावध झाल्याने बचावल्याचे सांगत पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे. तर, थोड्या वेळापूर्वीच आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतलीय. त्यानंतर नांगरे पाटील आता सह्याद्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे आता पोलीस काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे.
Leave a comment