बीड जिल्ह्यासाठी १७ हजार ६४० लसीचे डोस उपलब्ध
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण
७५ ठिकाणी शितगृह,९ ठिकाणी लसीकरण
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांची माहिती
बीड | वार्ताहर
कोरोनावर मात करणाऱ्या लसीचा शोध घेण्यात भारताला यश मिळाल्यानंतर आता १६ जानेवारीपासून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाला १७ हजार ६४० लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी अविरत सेवा बजावली अशा आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना लसीकरण करण्यासाठी १७ हजार कोव्हिड लसीची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने नोंदवलेली होती. बीड जिल्ह्यासाठी कोव्हिड लस बुधवारी बीड येथे उपलब्ध झाली. प्रत्यक्षात १७ हजार ६४० लसीचे डोस उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यासोबतच ज्यांना प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे अशा सर्वांचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले असून को-वीन ॲपमध्ये अगोदरच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरण प्रक्रिया नियोजनबद्ध पार पडावी यासाठी नुकताच बीड, वडवणी आणि परळी येथे ड्राय रन घेण्यात आला.
या माध्यमातून लसीकरणाची रंगीत तालीमच घेण्यात आली. त्यानंतर आता प्रत्यक्षात कोरणा लस्सी करण्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याला मिळणारा कोरोना लसीचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी ७५ ठिकाणी शीतगृह तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी प्रशिक्षित आरोग्यकर्मचाऱ्यांकडून लसीकरण केले जाणार आहे.
असे होणार लसीकरण
वडवणी आणि शिरूर वगळता जिल्ह्यासह आठ ठिकाणी हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथवर आरोग्य विभागातील प्रशिक्षित पाच कर्मचार्यासह इतर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ ठिकाणी ४५ प्रशिक्षित कर्मचार्याकडून हे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यांसह १५ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत.
Leave a comment